मुंबई 08 डिसेंबर : सोशल मीडिया हे व्हिडीओचं भंडार आहे. इथे एकामागून एक मनोरंजक व्हिडीओ समोर येत असतात. त्यांपैकी काही व्हिडीओ हे खूपच मनोरंजक असतात. जे आपल्याला पोट धरुन हसायला लावतात. तर काही व्हिडीओ हे आपल्यासमोर उदाहरण म्हणून येतात.
असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ कर्माचं फळ देणारं आहे. जो पाहून तुम्हाला हसू आवरनार नाही.
हे ही पाहा : किती तो निरागसपणा! आधी मेणबत्ती फुकता येत नव्हती, मग जेव्हा फुकली तेव्हा... Video Viral
या व्हिडीओमध्ये दोन तरुण बाईकवरुन जात असतात. तेव्हा रस्त्यात म्हशी उभ्या असतात. त्यांच्या बाजून जाण्यासाठी रस्ता तसा मोकळा होता. पण असं असलं तरी देखील मागे बसलेला तरुण म्हशीला लाथ मारतो. पण त्याच क्षणी त्याला त्याने केलेल्या चुकीची शिक्षा मिळते.
या तरुणाने म्हशीला लाथ मारल्यामुळे बाईकचा तोल बिघडतो, ज्यामुळे ते दोन्ही तरुण रस्त्याच्या बाजूला जाऊन पडतात. म्हशीसोबत असं अमानुषपणे वागल्याचीच त्यांना ही शिक्षा मिळाली असावी, असं म्हणायला काहीही हरकत नाही.
कर्म का फल जरूर मिलता है, कभी-कभी तो इतनी जल्दी मिल जाता है कि आप लोग खुद ही देख लीजिए.!#LifeLessons pic.twitter.com/SvPhkXve1W
— Sanjay Kumar, Dy. Collector (@dc_sanjay_jas) December 5, 2022
या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून कमेंट केल्या आहेत. हा व्हिडीओ Sanjay Kumar, Dy. Collector नावाच्या ट्वीटर अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. ज्यावर कर्माचं फळ नक्कीच मिळतं, तर कधी कधी ते इतके लवकर मिळते की तुम्ही ते स्वतःच पाहू शकता.
हा व्हिडीओ सर्वांसाठीच एक उदाहरण म्हणून समोर आला आहे. जो तुम्हाला हे दाखवून देतो की तुम्ही काहीही केलं तरी तुम्हाला कर्माचं फळ याच जन्मी भोगावं लागतं. वेळप्रसंगी ते दुसऱ्याच सेकंदाला भोगावं लागू शकतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shocking video viral, Social media, Top trending, Videos viral, Viral