जाहिरात
मराठी बातम्या / Viral / चालत्या कारवर अचानक पडली वीज, पुढे जे घडलं ते आश्चर्यचकीत करणारं, पाहा Video

चालत्या कारवर अचानक पडली वीज, पुढे जे घडलं ते आश्चर्यचकीत करणारं, पाहा Video

कारवर कोसळली वीज

कारवर कोसळली वीज

एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर समोर आला आहे. जो पाहून नेटकऱ्यांना 440 वोल्टचा झटका लागला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई 09 डिसेंबर : सोशल मीडियावर आपल्याला अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. काही व्हिडीओ हे थरारक असतात. तर काही व्हिडीओ हे मनोरंजक असतात. आपण मनोरंजनासाठीच सोशल मीडियाकडे वळतो. पण बऱ्याचदा इथले काही व्हिडीओ हे पाहून आपल्या पायाखालची जमीनच सरकेल. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर समोर आला आहे. जो पाहून नेटकऱ्यांना 440 वोल्टचा झटका लागला आहे. हो कारण हा व्हिडीओ वीजेशी संबंधीत आहे. हे ही पाहा : मृत्यू तुम्हाला कसा शोधून काढेल याचा काही नेम नाही… हा Video पाहून तुम्ही देखील हेच म्हणाल या व्हिडीओमध्ये एका चालत्या कारवर वीज पडली आहे. त्यानंतर काय घडलं? असा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच उभा राहिला असेल. मग तुम्ही हा व्हिडीओ नक्की पाहा. काही नैसर्गिक गोष्टींना आपण इच्छा असून देखील रोखू शकत नाही. त्याला आपल्याला सामोरं जावंच लागतं. यामध्ये कधी अती नुकसान होतं तर कधी ते फारसं काही नुकसान करत नाहीत. जसे की चक्रीवादळ, ओला किंवा सुका दुष्काळ, त्सुनामी, ढगफुटी, वीज इत्यादी. जरी त्सुनामी आणि चक्रीवादळ अजूनही अशा आपत्ती आहेत, ज्या क्वचितच दिसतात, परंतु वीज ही वारंवार पडत असल्याच्या अनेक बातम्या पावसाळ्यात समोर येत असतात.

जाहिरात

आता कधी, कुठे, कोणावर वीज पडेल हे कोणीच सांगू शकत नाही. असाच हा सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ आहे. जो आश्चर्यचकित करण्यासोबतच हृदयाला भिडणारा आहे. रस्त्याने जात असताना अचानक एका कारवर वीज कोसळते आणि त्यानंतर जे घडतं ते पाहून तुम्ही म्हणाल हीच खरी माणुसकी आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की रस्त्यावरून अनेक वाहने ये-जा करत आहेत. दरम्यान, अचानक आकाशातून कारवर वीज पडली, त्यानंतर कारमधून प्रचंड धूर येऊ लागला. मात्र, थोडे अंतर गेल्यावर चालक गाडी थांबवतो आणि त्यानंतर गाडीत असलेले सर्वजण बाहेर पडतात. यादरम्यान त्यांना मदत करण्यासाठी अनेक लोक तेथे जमतात. हीच खरी माणुसकी आहे की, जेव्हा या संकटकाळी लोकांना वाचवण्यासाठी इतर लोक धावून आले. एका कारसाठी रस्त्यावर इतके लोक जमले आहेत, जे पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. हा व्हिडीओ आणि त्यानंतरचे दृश्य खरच हृदय पिळवटून टाकणारा आहे.

News18लोकमत
News18लोकमत

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @OTerrifying नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘चालत्या गाडीवर वीज पडली आणि मग संपूर्ण शहर बचावासाठी आले’. अवघ्या 37 सेकंदांच्या या व्हिडीओला आतापर्यंत लाखोवेळा पाहिलं गेलं आहे. तसेच अनेकांनी यावर कमेंट्स आणि लाईक देखील केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात