मुंबई 25 ऑक्टोबर : सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्याचं लोकांना सध्या वेडच लागलं आहे. खरंतर सध्या लोक याकडे एक उत्पन्नाचं साहित्य म्हणून पाहातात. तसेच तुमचे जितके जास्त फॉलोअर्स तितके जास्त पैसे कमावता येणार. काही लोक खरोखरंच खूप चांगली माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतात. तर काही लोक हे प्रसिद्धीसाठी काहीही करण्याची तयारी दर्शवतात. ज्यामध्ये ते आपल्या जिवाची देखील पर्वा करत नाही. ज्यामुळे कधीकधी एकाद्याचा जीव जातो, तर काही गंभीर जखमी झाल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत. याच संबंधीत एक व्हिडीओ सोशल मीडिया वर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण आगीशी खेळण्याचा प्रयत्न करतो, परंतू त्याचा हा प्रयत्न फसतो, हा व्हायरल व्हिडीओ अंगावर काटा आणणारा आहे. खरंतर त्या तरुणासोबत जे घडतं, ते पाहून आपलीच इतकी वाईट अवस्था होते, तर विचार करा की त्याच्यासोबत किती भयंकर घटना घडली असावी. हे ही पाहा : आधी एक लाख फटाके आणि मग पेटवून दिली गाडी… प्रसिद्धीसाठी तरुणांचा वेडेपण, Video Viral हा स्टंटचा व्हिडीओ लोकांमध्ये खळबळ माजवत आहे, या तरुणाच्या अशा मुर्खपणाला पाहून त्याच्यावर हसावं की दु:ख व्यक्त करावं? हेच कळत नाहीय. हा तरुण आधी लोकांच्यामध्ये उभा असतो आणि त्याच्या हातात आगी असल्याचं देखील तुम्ही पाहू शकता, ज्यानंतर हा तरुण पेट्रोल तोंडात घेतो आणि मग तो बाहेर थूकून आग भडकवू पाहात होता. पण त्याचा हा स्टंट फसला आणि ही आग त्या तरुणाच्या तोंडाला लागली, ज्यामुळे त्याचं तोंड भाजलं. तेथे उपस्थीत लोकांनी या तरुणाच्या तोंडाला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी कपडा आणि हाताच्या सहाय्याने या तरुणाच्या तोंडाला लावलेले आग तर विझवली, परंतू हा तरुण यामुळे नक्कीच जखमी झाला असावा. हे ही पाहा : Viral Video : आधी गाईला लाथ मारली मग शेपूट खेचली… त्यानंतर जे घडलं ते अंगावर काटा आणणारं तुम्ही सर्कस किंवा काही कार्यक्रमात लोकांना आगीशी असं खेळताना पाहिलं असेल, पण हे लोक खूपच ट्रेन असतात. परंतू असं असलं तरी देखील असं करणं जिवावर बेतू शकतं, त्यामुळे कधीही असे प्रयोग न केलेलंच चांगलं.
आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर ‘ravipatidar603’ नावाने शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. तर साडे सहा लाखांहून अधिक लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. काही लोक या स्टंटला जीवघेणे म्हणत आहेत. तर काही लोक याला प्रसिद्धीसाठी केलेला मुर्खपणा म्हणत आहेत. तुम्ही देखील अशा व्हिडीओंना उदाहरण म्हणून घ्या आणि आयुष्यात असा मुर्खपणा करु नका आणि इतरांना ही असं करण्यापासून थांबवा.