मुंबई 23 ऑक्टोबर : दिवाळीला सुरुवात झाली आहे. लोकांची फराळ, नवीन कपडे आणि फटाके घेण्याची गडबड सुरु आहे. खरंतर सरकारने घालून दिलेल्या नियमांनुसार फटाके लावण्यासाठी बंदी घातली आहे, पण तुम्ही ग्रीन फटाके लावू शकता असं देखील सांगितलं जात आहे. त्यामुळे बरेचशे लोक या निमित्ताने फटाके लावताना दिसत आहे आणि आपल्या आजूबाजूला त्याचा आवाज देखील ऐकू येत आहे. लोकांमध्ये नेहमीच एकापेक्षा एक फटाके लावण्याची चढाओढ सुरु असते. त्यात एका तरुणाने तर हद्दच पार केली आहे. त्याने फटाके फोडणे आणि प्रसिद्ध होण्याच्या नातदात असं काही केलं आहे, ज्याचा आपण विचार देखील करु शकणार नाही. हे पाहा : कधी पाहिलय रस्त्यावर रंगीत दगड? ते का लावले जातात आणि त्याचं काम काय? हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांना धक्काच बसला आहे आणि त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. हा व्हिडीओ राजस्थानमधील असल्याचे समोर येत आहेत, ज्यात या तरुणांनी मिळून एका कारवर एक लाख फटाके लावले आहेत आणि ते पेटवले देखील. तुम्ही व्हिडीओच्या सुरुवातीला पाहू शकता की 3/4 तरुण आहेत. जे कारच्या समोर उभे राहून कारला फटाके लावणार असल्याचे सांगत आहे, ज्यानंतर ते या कारला सगळ्या बाजूने फटाके लावतात सुद्धा, ज्यानंतर हे तरुण त्या फटाके लावलेल्या कारमध्ये फिरतात देखील अखेर ते या कारला रात्रीपर्यंत फिरवतात आणि मग लांब डोंगरावर नेतात. हे ही पाहा : बाईकमधून येत होता विचित्र आवाज, स्पीड मीटर पाहताच चुकला हृदयाचा ठोका, पाहा Video तेथे हे तरुण कारवरील फटाके पेटवतात आणि ते दुश्य कारमध्ये कैद देखील करतात. हे फटाके फुटताना कार कशी दिसेते? हे देखील ते तरुण दाखवतात. अगदी तुम्ही कारच्या सगळ्या बाजूने कार फुटताना पाहू शकता. त्यानंतर हे फटाके फुटून सगळं शांत झाल्यानंतर ते तरुण कारची अवस्था दाखवतात.
तुम्ही व्हिडीओमध्ये हे पाहू शकता की कसं कारचं नुकसान झालं आहे, एवढंच काय तर हे तरुण आतून देखील कारची स्तिथी दाखवतात आणि कारवरुन फिरु लागतात. ही कार तशी चालत आहे. पण तिची अवस्था खूपच खराब झाली आहे. अमित शर्मा नावाच्या युट्युबरने हा पराक्रम केला आहे. केवळ आणि केवळ प्रसिद्धीसाठी या तरुणांनी हा सगळा प्रकार केल्याचं लक्षात येत आहे. या तरुणांच्या अशा कृत्यानंतर लोकांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. परंतू असे देखील लोक आहेत, ज्यांना हा व्हिडीओ खूप आवडला आहे, ज्यामुळे ते हा व्हिडीओ सगळीकडे शेअर करत आहेत. या मुलांनी प्रसिद्धीसाठी काहीही करण्याची तयारी दाखवली असली तरी, असं करणं खूपच धोकादायक ठरु शकतो, त्यामुळे तुम्ही असं कृत्य करु नका. आमचा उद्धेश फक्त हा व्हिडीओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आहे.