नवी दिल्ली 23 ऑगस्ट : सोशल मीडियावर दररोज नवनवे व्हिडिओ व्हायरल (Video Viral on Social Media) झाल्याचं पाहायला मिळतं. यातील अनेक व्हिडिओ माणुसकीला काळिमा फासणारे असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ व्हायरल (Shocking Video) होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती वयस्कर महिलेला अमानुषपणे रस्त्यावरुन ओढत घेऊन जाताना दिसत (Son Brutally Beating His Mother) आहे. व्हिडिओमध्ये ही महिला मोठमोठ्यानं ओरडताना दिसते. एका ट्विटमध्ये (Tweet) सांगितलं आहे, की या महिलेला रस्त्यावरून ओढत नेणारा व्यक्ती तिचा मुलगा आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, ही घटना तमिळनाडूच्या नामक्कल शहरातील असल्याचं म्हटलं जात आहे. यात एका मुलानं अमानुषपणाच्या सगळ्या हद्दी पार केल्याचं पाहायला मिळतं. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की हा मुलगा आपल्याच आईला मारत आहे आणि रस्त्यावरून ओढत घेऊन जात आहे. या महिलेचं नाव मालकीन नल्लम्मल असं आहे. पतीच्या मृत्यूनंतर ही महिला पोन्नेरिपट्टीमध्ये एकटीच राहत होती. आपली जमीन त्यांनी आधीच मुलाच्या नावावर केली होती. मात्र, आता या मुलाला आपल्या आईच्या कमाईतूनही पैसे हवे आहेत.
स्टेजवर नवरीसमोर जात सासूने लगावले ठुमके; जबरदस्त डान्स पाहून सगळेच फिदा, VIDEO
व्हिडिओमध्ये आपल्या आईला ओढत घेऊन जाणाऱ्या या व्यक्तीचं नाव शनमुगम असल्याचं समोर आलं आहे. नल्लम्मल यांच्याकडे एक पाळीव कुत्रा आहे. शनमुगम आपल्या मालकीणीला मारहाण करत असल्याचं पाहून तो बचावासाठी मध्ये आला. कुत्रा शनमुगमवर बऱ्यादा धावून गेला आणि आपल्या मालकीणीला वाचवण्याचा त्यानं पूर्ण प्रयत्न केला. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की नल्लम्मल यांनी वाचवण्यासाठी त्यांचा कुत्रा कशाप्रकारे शनमुगमला दूर पळवत आहे. यादरम्यान शनमुगमदेखील कुत्र्याच्या भीतीनं आपल्या आईला ओढणं बंद करतो.
A man in #TamilNadu 's Ponneripatti brutally attacked his mother for money while her dog tried to protect her. #brothersisterlove #Chennai #Chiranjeevi #HappyRakshaBandhan #HBDMegastarChiranjeevi #Manipur #MadrasDay #WhyModiAvoidsMSP #WorldSanskritDay pic.twitter.com/qQbnYQpCua
— Vijay kumar🇮🇳 (@vkvkmarwat) August 22, 2021
VIDEO: नागाला बहिणीकडून राखी बांधून घेत होता; सर्पदंशानं सर्पमित्राचा मृत्यू
हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून एका यूजरनं म्हटलं, की एका प्राण्याला माणसाचं महत्त्व माहिती आहे, मात्र एक माणूसच दुसऱ्या माणसाला वाईटरित्या मारहाण करत आहे. तर, दुसऱ्या एका यूजरनं म्हटलं, की कुत्र्यानं ज्याप्रकारे महिलेला वाचवण्याचा प्रयत्न केला आहे, ते कौतुकास्पद आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनीही या प्रकरणात कारवाई करत शनमुगम याला अटक केली आहे. तर, त्याची पत्नी फरार असून सध्या तिचा शोध सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dog, Emotional, Shocking viral video