मराठी बातम्या /बातम्या /Viral /नागाला बहिणीकडून राखी बांधून घेत होता; साप चावल्यानं रक्षाबंधनदिवशीच सर्पमित्राचा मृत्यू, Shocking Video

नागाला बहिणीकडून राखी बांधून घेत होता; साप चावल्यानं रक्षाबंधनदिवशीच सर्पमित्राचा मृत्यू, Shocking Video

25 वर्षाच्या मनमोहन उर्फ भूअरनं अनेक विषारी सापांना रेसक्यू केलं होतं. रविवारी तो दोन नागांची शेपटी पकडून आपल्या बहिणीकडून या नागांना राखी बांधून घेत होता.

25 वर्षाच्या मनमोहन उर्फ भूअरनं अनेक विषारी सापांना रेसक्यू केलं होतं. रविवारी तो दोन नागांची शेपटी पकडून आपल्या बहिणीकडून या नागांना राखी बांधून घेत होता.

25 वर्षाच्या मनमोहन उर्फ भूअरनं अनेक विषारी सापांना रेसक्यू केलं होतं. रविवारी तो दोन नागांची शेपटी पकडून आपल्या बहिणीकडून या नागांना राखी बांधून घेत होता.

नवी दिल्ली 23 ऑगस्ट : रक्षाबंधनच्या (Rakshabandhan) दिवशी बहिणीकडून सापाला राखी (Rakhi) बांधून घेणं एका युवकाला चांगलंच महागात पडलं आहे. पायाच्या बोटाला सापानं चावा घेतल्यानं मनमोहन नावाच्या एका युवकाचा मृत्यू झाला आहे (Man Died After Being Bitten by Snake). हा युवक मागच्या दहा वर्षांपासून विषारी सापांना रेसक्यू (Snake Rescue Operation) करण्याचं आणि साप चावलेल्या व्यक्तींवर उपचार करण्याचं काम करायचा. ही घटना बिहारच्या (Bihar) सारण जिल्ह्यातील मांझी ठाणा क्षेत्रातील आहे.

25 वर्षाच्या मनमोहन उर्फ भूअरनं अनेक विषारी सापांना रेसक्यू केलं होतं. रविवारी तो दोन नागांची शेपटी पकडून आपल्या बहिणीकडून या नागांना राखी बांधून घेत होता. इतक्यात सापानं मनमोहनच्या पायाच्या बोटाला चावा केला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात मनमोहन आपल्या बहिणीकडून सापांना राखी बांधून घेण्याचा प्रयत्न करत आहे.

विकृतीचा कळस! घोडीवर बलात्कार; आठवड्यातून 4 वेळा कंडोम घालून लैंगिक संबंध

साप चावल्यानंतर युवकाच्या कुटुंबीयांनी घरीच त्याच्यावर उपचार करण्यास सुरुवात केली. मात्र, यादरम्यान युवकाची प्रकृती अधिकच खालवली. यानंतर लगेचच त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तिथे अॅन्टी वेनम इंजेक्शन उपलब्ध नव्हतं. यामुळे त्याचे कुटुंबीया त्याला दुसऱ्या एका रुग्णालयात घेऊन गेले. मात्र, उपचार मिळायला उशिर झाल्याचं सांगत डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

" isDesktop="true" id="595516" >

आसपासच्या गावातील लोक मनमोहनला सापांचा खरा मित्र म्हणत असे. गावात कोणाच्याही घरी साप निघाला तरी लोक त्यालाच सापाला बाहेर काढण्यासाठी बोलवत असत. इतकंच नाही तर गावात कोणाला साप चावला तरीही लोक मनमोहनलाच बोलवत असे. गावकऱ्यांचा असा दावा आहे, की त्याच्या मंत्रांनीच ज्याला साप चावला आहे तो ठीक होत असे. तो मंत्र म्हणूनच विष नष्ट करायचा. अशात आता मनमोहननंच सापामुळे जीव गमावल्याचं ऐकून लोकांना धक्का बसला आहे.

VIDEO: महिलेनं युवकाला भर चौकात चपलेनं धू-धू धुतलं; संतापजनक कारण आलं समोर

मनमोहन सापांचं रेसक्यू आणि उपचार यामुळे आसपासच्या जिल्ह्यांमध्येही प्रसिद्ध होता. छपरासोबतच आसपासच्या सिवान आणि बलिया जिल्ह्यातही साप पकडण्यासाठी मनमोहनलाच बोलावलं जात असे. तो साप पकडून त्यांना जंगलात सोडत असे. इतकंच नाही तर तो जखमी सापांवर उपचारही करत असे.

First published:
top videos

    Tags: Shocking viral video, Snake video