मराठी बातम्या /बातम्या /Viral /बापरे! भरधाव कारवर अजगरानं घेतली उडी अन्...; पाहा घटनेचा Shocking Video

बापरे! भरधाव कारवर अजगरानं घेतली उडी अन्...; पाहा घटनेचा Shocking Video

सध्या सोशल मीडियावर एक अजगराचा व्हिडिओ व्हायरल (Python Attack Video) होत आहे. यात दिसतं, की एक अजगर रस्त्यावरुन येणाऱ्या एका भरधाव वेगातील गाडीवर हल्ला करतो

सध्या सोशल मीडियावर एक अजगराचा व्हिडिओ व्हायरल (Python Attack Video) होत आहे. यात दिसतं, की एक अजगर रस्त्यावरुन येणाऱ्या एका भरधाव वेगातील गाडीवर हल्ला करतो

सध्या सोशल मीडियावर एक अजगराचा व्हिडिओ व्हायरल (Python Attack Video) होत आहे. यात दिसतं, की एक अजगर रस्त्यावरुन येणाऱ्या एका भरधाव वेगातील गाडीवर हल्ला करतो

नवी दिल्ली 10 जुलै : मनुष्य ज्या वेगानं जंगलं नष्ट करून मानवी वस्ती स्थापन करत आहे, त्यामुळे प्राण्यांनाही (Wild Animals) आपल्याच घरातून बाहेर पडावं लागत आहे. अशात हे प्राणी अनेकदा मानवी वस्तीकडे आपला मोर्चा वळवतात. सापाचं तर नाव ऐकूनच अनेकांचा थरकाप उडतो. अशात साप समोर येऊन थांबला तर काही सांगायलाच नको. सध्या सोशल मीडियावर असाच एक अजगराचा व्हिडिओ व्हायरल (Python Attack Video) होत आहे. यात दिसतं, की एक अजगर रस्त्यावरुन येणाऱ्या एका भरधाव वेगातील गाडीवर हल्ला करतो. त्यानंतर जे काही घडतं ते हैराण करणारं (Shocking Video Viral) आहे.

देशातील 'व्हिसलिंग व्हिलेज'; या गावात अनोख्या पद्धतीनं सांगितलं जातं स्वत:चं नाव

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की जंगलातून जाणाऱ्या एका रस्त्याच्या मधोमध एक अजगर बसलेला आहे. तिथून जाणाऱ्या गाड्यांवर तो हल्ला करत आहे. इतक्यात एक गाडीत वेगात तिथे येते आणि अजगर या गाडीवर चढतो. अजगर दिसताच चालक आपली कार थांबवतो. मात्र, अजगर कारच्या आत घुसण्याचा प्रयत्न करतो. मात्र, चालकानं गाडीच्या काचा बंद केल्यानं तो आत जाऊ शकला नाही आणि गाडीच्या बोनेटमध्ये शिरला.

" isDesktop="true" id="577273" >

अबब! तब्बल 25 किलोचा लॉलिपॉप; कसा बनवला आणि खायचा कसा पाहा VIDEO

या घटनेबाबत सर्पमित्राला माहिती देण्यात आली. यानंतर सर्पमित्रानं याठिकाणी येत कारचं बोनेट उघडून अजगराला पकडलं. यानंतर त्याला जंगलात सोडण्यात आलं. हा व्हिडिओ यूट्यूब चॅनल Latest Sightings वरुन शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ 35 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. हा व्हिडिओ लोकांच्या पसंतीस उतरत आहे. लोक हा व्हिडिओ एकमेकांना शेअर करण्यासोबतच यावर निरनिराळ्या प्रतिक्रियाही देत आहेत. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही नक्कीच हैराण झाला असाल.

First published:

Tags: Python snake, Shocking video viral