मराठी बातम्या /बातम्या /Viral /अबब! तब्बल 25 किलोचा लॉलिपॉप; कसा बनवला आणि खायचा कसा पाहा VIDEO

अबब! तब्बल 25 किलोचा लॉलिपॉप; कसा बनवला आणि खायचा कसा पाहा VIDEO

फिरोझ चुट्टिपारा (Feroz Chuttipara) यांनी जगातलं सर्वांत मोठं लॉलिपॉप तयार केलं आहे. त्यांच्या दाव्यानुसार हे लॉलिपॉप 25 किलो वजनाचं आहे.

फिरोझ चुट्टिपारा (Feroz Chuttipara) यांनी जगातलं सर्वांत मोठं लॉलिपॉप तयार केलं आहे. त्यांच्या दाव्यानुसार हे लॉलिपॉप 25 किलो वजनाचं आहे.

फिरोझ चुट्टिपारा (Feroz Chuttipara) यांनी जगातलं सर्वांत मोठं लॉलिपॉप तयार केलं आहे. त्यांच्या दाव्यानुसार हे लॉलिपॉप 25 किलो वजनाचं आहे.

  मुंबई, 9 जुलै- खाद्यपदार्थांबद्दलच्या व्हिडिओजची इंटरनेटवर कमतरता नाही. अनेक व्हिडिओ खाद्यपदार्थांचं (Food Videos) वेगळेपण दाखवणारे किंवा त्यातला काही विक्रम दाखवणारेही असतात. म्हणजे 100 किलोचा केक, चॉकलेटपासून तयार केलेली खूप मोठी बाहुली किंवा 1000 आंब्यांची सजावट वगैरे वगैरे अशा वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ त्यात असतात. त्यात आता आणखी एका व्हिडिओची भर पडली आहे. 'व्हिलेज फूड चॅनेल' (Village Food Channel) या एका लोकप्रिय यू-ट्यूब चॅनेलवर (YouTube Channel) प्रसिद्ध करण्यात आलेला हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या चॅनेलचे क्रिएटर फिरोझ चुट्टिपारा (Feroz Chuttipara) यांनी जगातलं सर्वांत मोठं लॉलिपॉप तयार केलं आहे. त्यांच्या दाव्यानुसार हे लॉलिपॉप 25 किलो वजनाचं आहे. हे लॉलिपॉप कसं तयार करण्यात आलं याची प्रक्रिया सुमारे 10 मिनिटांच्या या व्हिडिओत दाखवण्यात आली आहे. अपलोड केल्यापासून अवघ्या तीन दिवसांत या व्हिडिओला 10 लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. घराबाहेरच्या एका ठिकाणी फिरोझ आणि त्यांचे सहकारी हे विक्रमी लॉलिपॉप तयार करत असताना त्या व्हिडिओत पाहायला मिळतं.

  " isDesktop="true" id="577101" >

  सुरुवातीला एका खूप मोठ्या भांड्यात साखर आणि पाणी (Sugar & Water) यांचं मिश्रण ते दोघं उकळवत असल्याचं व्हिडिओत दिसतं. त्यानंतर त्यात काही फ्लेव्हर्स (Flavours) आणि खाद्यरंग मिसळले जातात. त्यानंतर हे मिश्रण एका मातीच्या भांड्यात ओतलं जातं. या मिश्रणाला त्या मातीच्या भांड्याचा आकार प्राप्त व्हावा, असा त्यामागचा उद्देश असतो. त्यानंतर भांड्यात ओतलेल्या त्या मिश्रणात काठी रोवली जाते आणि नंतर बाहेरचं ते मातीचं भांडं फोडलं जातं. एवढं केल्यानंतर हे सर्वांत मोठं लॉलिपॉप (World's Biggest Lollipop) तयार होतं. तयार झालेल्या लॉलिपॉपचा छोटा तुकडा तोडून ते दोघं त्याची चव घेत असतानाही व्हिडिओत दिसतं.

  (हे वाचा: जगातील तिसऱ्या सर्वात धोकादायक एअरपोर्टवर लँडिंग; VIDEO पाहून हादराल )

  फिरोझ यांनी असा काही तरी वेगळा प्रयोग करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांनी अशाच काही विक्रमी पदार्थांची निर्मिती करून त्यांचे व्हिडिओ शेअर केले होते. 50 किलो वजनाचं सर्वांत मोठं आइस्क्रीम तयार करून त्याचा एक व्हिडिओ त्यांनी पूर्वी शेअर केला होता. पाच किलो हर्बल फिश फ्राय तयार करतानाचा व्हिडिओही फिरोझ चुट्टीपारा यांनी व्हिलेज फूड चॅनेल या आपल्या यू-ट्यूब चॅनेलवर अपलोड केला होता. तसंच, आणखी एका वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी व्हिडिओमध्ये त्यांनी 500 किलो वजनाची भाजी घेऊन खाद्यपदार्थ तयार केला होता. असे वैविध्यपूर्ण व्हिडिओ पाहायला मिळत असल्याने त्यांच्या चॅनेलची प्रेक्षकसंख्याही मोठी आहे. त्यांच्या चॅनेलला 49 लाख सबस्क्रायबर्स आहेत.

  (हे वाचा:VIDEO: चिमुकल्याच्या स्टंटचा धुमाकूळ; फ्लाईंग किकमुळे अक्षय कुमारशी तुलना  )

  इंटरनेटवर खाद्यपदार्थविषयक अशा व्हिडिओची चलती आहे. काही कालावधीपूर्वी जगातला सर्वांत मोठा एग चिकन रोलही लोकांना इंटरनेटवर पाहायला मिळाला होता. काठी रोल या नावाने ओळखला जाणारा हा पदार्थ कोलकात्यातल्या लोकप्रिय स्ट्रीट-फूडपैकी एक आहे. तिथल्या शेफ अल्लादिन नावाच्या एका रेस्तराँने केलेला हा जगातला सर्वांत मोठा एग रोल 349 रुपयांना उपलब्ध होता.

  First published:
  top videos

   Tags: Video viral, Viral news, YouTube Channel