Home /News /viral /

चक्क अजगराला घाबरुन वाघानं काढला पळ; VIDEO मध्ये पाहा नेमकं काय घडलं

चक्क अजगराला घाबरुन वाघानं काढला पळ; VIDEO मध्ये पाहा नेमकं काय घडलं

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओ (Viral Video) क्लिपमध्ये दिसतं, की वाघ कुठेतरी जात आहे. इतक्यात त्याच्या रस्त्यात एक मोठा अजगर येतो.

  नवी दिल्ली 04 सप्टेंबर : समोरचा प्राणी कितीही मोठा असो किंवा लहान त्याची शिकार करण्याचं धाडस अजगर (Python) करतोच. एकदा अजगराच्या तावडीत एखादा जीव सापडला तर त्याच्यापासून सुटका करून घेणं जवळपास अशक्य होऊन जातं. मात्र, जर समोर वाघ उभा असेल तर अशावेळी हा प्रश्न उपस्थित होतो की दोघांमध्ये कोण जिंकेल. सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल (Video Viral on Social Media) झाला आहे. यात दिसतं की वाघाच्या वाटेत एक भलामोठा अजगर साप (Python and Tiger Fight) येतो. मात्र, यानंतर जे काही घडतं, ते पाहून तुम्हीही हैराण व्हाल. पठ्ठ्याने कमालच केली! हँडल नव्हे तर चक्क सीट पकडून चालवली बाईक; पाहा VIDEO सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक निरनिराळे व्हिडिओ (Animal Videos) व्हायरल होताना दिसतात. असं म्हणणंही चुकीचं ठरणार नाही की हा कंटेट सोशल मीडियावर सर्वात जास्त पाहिला जातो. असाच एक अजगर आणि सापाचा व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओ क्लिपमध्ये दिसतं, की वाघ कुठेतरी जात आहे. इतक्यात त्याच्या रस्त्यात एक मोठा अजगर येतो. आता दोन्ही शक्तीशाली प्राणी समोर असल्यामुळे दोघंही सतर्क होणं सहाजिकच आहे. इथेही अगदी असंच झालं. अजगराला पाहून काही वेळासाठी वाघही थांबतो. यानंतर काही वेळात तो पुढे जाण्याचा प्रयत्न करतो मात्र अजगर त्याला तिथून जाऊ देत नाही.
  View this post on Instagram

  A post shared by Animals (@petnation365)

  व्हेलने बोटीला धक्का दिला आणि..., मृत्यूच्या तोंडात तरुणी; VIDEO पाहून भरेल धडकी आता तुमच्या डोक्यात असा विचार आला असेल, की यात नेमकी हार कोणाची झाली. दोघांमधील कोणी माघार घेतली. तर, सध्या व्हायरल होणारी व्हिडिओ क्लिप पाहून तुम्हीही हैराण व्हाल. कारण, बराच वेळ अजगरानं रस्ता न दिल्यानं स्वतः वाघानंच तिथून पळ काढला. इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ petnation365 नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Python snake, Shocking video viral

  पुढील बातम्या