• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • पठ्ठ्याने कमालच केली! हँडल नव्हे तर चक्क सीट पकडून चालवली बाईक; पाहा VIDEO

पठ्ठ्याने कमालच केली! हँडल नव्हे तर चक्क सीट पकडून चालवली बाईक; पाहा VIDEO

तरुणाची बाईक चालवण्यासाठी हटके स्टाईल सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे.

 • Share this:
  मुंबई, 03 सप्टेंबर : बाईकसोबत (Bike) वेगवेगळ्या करामती (Bike video) करायला बहुतेकांना आवडतं. किती तरी तरुण बाईकसोबत स्टंट (Bike stunt) मारतात. कुणी स्पीडने बाईक (Bike stunt video) चालवण्यात तरबेज असतं, कुणी बाईकचं हँडल सोडून बाईक चालवतं, कुणी एका चाकावर बाईक (Bike riding) चालवतं. बाईकचे असे बरेच थक्क करणारे स्टंट तुम्ही पाहिले असतील. हे व्हिडीओ पाहूनच धडकी भरते. पण सध्या सोशल मीडियावर बाईक रायडिंगचा (Bike riding video) असा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, जो पाहून धडकी नाही भरणार पण धक्का मात्र नक्कीच बसेल. तरुणाने हटके स्टाईलने बाईक चालवली आहेत. त्याच्या बाईक रायडिंगचा अंदाज पाहून तुम्हाला आश्चर्यच वाटले. तरुणाने चक्क मागच्या दिशेला तोंड करून बसत उलट्या बाजूने बाईक चालवली आहे. तरुणाने नेमकं हे केल तरी कसं? असा प्रश्न तुम्हाला पडेल.
  View this post on Instagram

  A post shared by ENDDD JANTA (@enddd_janta)

  व्हिडीओत पाहू शकता. सामान्यपणे बाईक चालवताना आपण ज्या बाजूला तोंड करून बसतो. बाईकच्या समोरील हँडल धरून बाईक चालवतो. पण हा तरुण त्याच बाजूला पाठ करून बसला आहे. म्हणजे तो गाडीवर उलटा बसला आणि सीटला धरून तो बाईक चालवताना दिसतो आहे. हे वाचा - व्हेलने बोटीला धक्का दिला आणि..., मृत्यूच्या तोंडात तरुणी; VIDEO पाहून भरेल धडकी असंच उलटं बसून तो पेट्रोल पंपवर बाईक फिरवताना दिसतो. व्हिडीओ पाहून आपल्यालाही आश्चर्य वाटतं. पण व्हिडीओ नीट पाहिला तर या तरुणाने आपल्या बाईकची रचना बदलली आहे. त्याने सीटच्या दिशेने हँडल जोडले आहेत आणि त्याला धरून तो बाईक चालवतो आहे. हे वाचा - चालत्या बाईकवर आरामात झोपला दुचाकीस्वार अन्...; हा Video पाहून व्हाल हैराण अनोखी म्हणा, विचित्र म्हणा किंवा हटके म्हणा.पण तरुणाची ही बाईक रायडिंग नेटिझन्सच्या चांगलीच पसंतीस पडत आहे. @enddd_janta इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.
  Published by:Priya Lad
  First published: