Home /News /viral /

Whale ने बोटीला धक्का दिला आणि..., 'मृत्यू'च्या तोंडात तरुणी; VIDEO पाहून भरेल धडकी

Whale ने बोटीला धक्का दिला आणि..., 'मृत्यू'च्या तोंडात तरुणी; VIDEO पाहून भरेल धडकी

व्हेल रूपाने मृत्यू तिच्यासमोर आला आणि...

    मुंबई, 03 सप्टेंबर : मृत्यू नेमका कसा असतो, कसा दिसतो हे जिवंतपणी अनुभवता येत नाही. पण एका तरुणीने मात्र आपला मृत्यू स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला किंबहुना अनुभवला (Whale near boat). अगदी मृत्यूच्या तोंडातच जणू ही तरुणी होती. हा व्हिडीओ (Viral video) पाहून तुम्हाला धडकीच (Shocking video) भरेल (Whale video). व्हेल माशाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये महाकाय व्हेलने एका छोट्याशा बोटीला टक्कर दिली. या बोटीवर तरुणी बसली होती. व्हिडीओ पाहताच आपल्या काळजाचा ठोका चुकतो. व्हिडीओत पाहू शकता पाण्यामध्ये एक तरुणी पॅडलबोर्डिंग करत आहे. बोटीवर ती एकटीच आहे. इतक्यात तिच्याजवळ भलामोठा व्हेल मासा येतो. माशाला पाहूनच घाम फुटतो. तो इतका विशाल आहे की बोटीइतकं तर फक्त त्याचं तोंडच आहे. हे वाचा - अरे बापरे! गाड्यांसमोर येत 2 सिंहांनी घातली झडप; हायवेवरील शिकारीचा थरारक VIDEO मासा बोटीजवळ येतो, बोटीवर कुणीतरी बसलं आहे हे तो पाहतो आणि उलटा होऊन आपल्या परांनी बोटीला धक्का देतो. आता काही या तरुणीचं खरं नाही असंच आपल्याला वाटतं. मासा बोटीला धक्का दिल्यानंतर थोडा वेळ थांबतो. त्यानंतर तो त्या बोटीच्या खालून जातो आणि नंतर बोटीच्या आजूबाजूलाच फिरतो. हे वाचा - VIDEO - म्हशीवर हल्ला केल्याने चवताळला रेडा; चक्क सिंहांनाही शिंगावर धरून आपटलं ही संपूर्ण धक्कादायक घटना ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाली आहे.  फोटोग्राफर मॅक्सी जोनासने हा व्हिडीओ आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ट्विटरवर त्याने हा व्हिडीओ शेअर करता, मी आज माझ्या जीवनातील सर्वात चांगला असा व्हेल ड्रोन व्हिडीओ बनवला आहे, असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे. हा व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्यात कमेंट येत आहेत.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Shocking viral video, Viral, Viral videos, Whale

    पुढील बातम्या