जाहिरात
मराठी बातम्या / Viral / थरारक! वळण घेताच ट्रेलर ट्रक कोसळला, समोरुन येणाऱ्या कारला असं चिरडलं की ती खेळण्यातलीच, VIDEO VIRAL

थरारक! वळण घेताच ट्रेलर ट्रक कोसळला, समोरुन येणाऱ्या कारला असं चिरडलं की ती खेळण्यातलीच, VIDEO VIRAL

थरारक! वळण घेताच ट्रेलर ट्रक कोसळला, समोरुन येणाऱ्या कारला असं चिरडलं की ती खेळण्यातलीच, VIDEO VIRAL

हायवेवर भरधाव वेगाने गाड्या धावत आहेत. त्यावेळी अचानक एक मोठा ट्रेलर ट्रक टर्न घेतो, ज्यामुळे त्याचा बॅलेंस जातो आणि तो खाली असलेल्या कारवर कोसळतो.

  • -MIN READ Punjab
  • Last Updated :

पंजाब 14 सप्टेंबर : सोशल मीडियावर नेहमीच आपल्यासमोर वेगवेळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. जे कधी मनोरंजक तर कधी थरकाप उडवणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहून तुमच्या दृदयाचा ठोका चूकेल. हो या व्हायरल व्हिडीओमध्ये एका लोडेड ट्रकने अचानक घेतलेल्या टर्नमुळे तीन लोकांचा मृत्यू झाला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हायवेवर भरधाव वेगाने गाड्या धावत आहेत. त्यावेळी अचानक एक मोठा ट्रेलर ट्रक टर्न घेतो, तेव्हा 3 ते 4 गाड्या तेथून जात असतात. तेवढ्यात बाकीच्या कारने कसं-बसं नियंत्रण मिळवलं, परंतू एक कार त्या ट्रेलरला जाऊन ठोकली आणि तो ट्रेलर त्या कारवर पडला. हा ट्रेलर असा काही कारवर पडला की, कारचा पूर्णपणे चूरा झाला. ही घटना पाहातानाच अंगावर काटा उभा राहात आहे. हे वाचा : Video : रेल्वे फाटक बंद असताना ही त्यानं ते ओलांडलं, भरधाव ट्रेनलाही नाही जुमानलं अखेर… ही घटना पंजाबमध्ये घडली, येथील नवांशहरमध्ये एका मध्यमवयीन जोडप्याला आणि त्यांच्या मुलाला त्यांच्या कारने भरलेल्या ट्रेलरने चिरडले होते, पोलिसांनी सांगितले. ही घटना सोमवारी घडली तेथे एका वाळू आणि दगडांनी भरलेला ट्रेलर ट्रक व्यस्त फगवाडा-चंदीगड राष्ट्रीय महामार्गावर बेहरामजवळ अचानक वळण घेताना समोरुन येणाऱ्या कारवर उलटला. ट्रेलरने भरधाव वेगाने वळण घेतल्याने त्याचा तोल गेला आणि तो कार उलटला, ज्यामुळे एका कारचा पूर्णपणे चुरा झाला, तर एका कारचं थोड्याप्रमाणात नुकसान झालं आहे. हे वाचा : ‘स्कूल चले हम’ विद्यार्थी नाही तर चक्क वानरालाच लागली शिक्षणाची गोडी, पाहा Video ट्रेलर ट्रक चालकाला बेदरकारपणे आणि निष्काळजीपणे गाडी चालवल्याबद्दल अटक करण्यात आली आहे आणि त्याच्यावर पुढील कारवाई करण्यात येत आहे.

जाहिरात

हा व्हिडीओ सर्वांसाठी एक उदाहरण म्हणून समोर आला आहे. आपली चूक असोत किंवा नसोत कधी कधी समोरच्या व्यक्तीच्या चूकीमुळे दुर्घटना घडू शकते. त्यामुळे गाडी चालवताना किंवा रस्त्यावरुन चालताना नेहमीच सतर्क राहा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात