मुंबई 14 सप्टेंबर : बऱ्याचदा लहान मुलांना शाळेत जायचं नसतं, ज्यासाठी ते इतकी नाटकं करतात की ते काहीही ऐकायला तयार नसतात. परंतू एक चक्कं एक वानर दररोज शाळेत शिकायला येत आहे. ते ही कसलं ही नाटक न करता. तुम्हाला हे ऐकून थोडा धक्का बसेला असेल, परंतू हे खरं आहे. यासंबंधी एक व्हिडीओ सोशल मीडियावर भलताच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की वानर या शाळेत येऊन चक्क अभ्यास शिकत आहे. हा व्हिडीओ झारखंड-बिहार सीमेवरील आहे. येथे मुख्यालयापासून 13 किमी अंतरावर पठार आणि पर्वतांच्या मधोमध एक शाळा आहे. जेथे अनेक दिवसांपासून एक वानर वर्गात अभ्यासासाठी येतोय आणि तथे मुलांसोबत शिकत देखील आहे. या घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या विचित्र घटनेने स्थानिक लोकही हैराण झाले आहेत. शाळेचे मुख्याध्यापक रतनकुमार वर्मा यांनी याबाबत माहिती दिली. हे वाचा : ‘‘आमच्या वेळेला कुठे होते असे शिक्षक?’’ हा क्यूट VIDEO पाहून तुम्हीही असंच म्हणाल हा वानर रोज शाळेत येऊन मुलांसोबत कसा बसतो हे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. जेव्हा शिक्षक मुलांना शिकवत आहेत, तेव्हा देखील हा वानर मनपूर्वक या शिक्षकाचं ऐकत आहे. जेव्हा मुलं त्यांच्या वहीत अभ्यास लिहत आहेत, तेव्हा तो त्यांच्या वहीत डोकावत आहे. या वानराची शिकण्याची किती इच्छा आहे, हे या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
'स्कूल चले हम' वानराला लागली शिक्षणाची गोडी#ViralVideo #trending pic.twitter.com/v5Rkc2pAP8
— News18Lokmat (@News18lokmat) September 14, 2022
एवढेच नाही तर शिक्षकाने त्याला जाण्यास सांगितले असता त्याने जाण्यास नकार दिला. मुलं शाळेबाहेर उभं असताना, तोही तिथे जाऊन उपस्थीत राहातो. हे वाचा : जेव्हा धोकादायक सापासमोर येऊन झोपला तरुण, पुढे जे घडलं ते अंगावर काटा आणणारं पाहा Video या घटने बाबत सांगताना शाळेचे मुख्याध्यापक म्हणाले, या वानराला पाहून काही मुलं आणि शिक्षक घाबरत आहेत. ते म्हणाले, शनिवार पासून हा माकड येऊ लागला आहे. नववीच्या वर्गात बसून तो सर्वं ऐकत राहिला. रविवारी सुट्टी होती, त्यानंतर सोमवारी पुन्हा वर्गासाठी वेळेवर शाळेत पोहोचला. तो आलटून पालटून सर्व वर्गात गेला. परंतू तो जेव्हा लहान मुलांच्या वर्गात गेला, तेव्हा मुले आणि शिक्षक पळून जाण्याचा प्रयत्न करतात तेव्हा मात्र या वानराला राग येतो. त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळा आणि सुरक्षेसाठी त्याला पकडण्याचे आवाहन वनविभागाला केले आहे. तेव्हा गौतम बुद्ध वन्यजीव अभयारण्याचे वन कर्मचारी शाळेत पोहोचले. खूप प्रयत्न केला, पण तो वान काही सापडला नाही. अखेर तो वानर बुधवारीही पुन्हा शाळेत येऊन पोहोचला.