लंडन, 08 एप्रिल : फोटो म्हणजे आठवणींचा पेटारा. फोटो पाहताच आपल्या अनेक आठवणींना उजाळा मिळतो. हा फोटोही अगदी तसाच आहे. फोटो पाहिल्यानंतर तसं आपल्यालाही प्रसन्न वाटतं. कारण एका निसर्गरम्य ठिकाणचा हा फोटो आहे. जिथं हे कपल अगदी आनंदात फोटो काढताना दिसतं आहे. अगदी हॅप्पी कपल. पण या हॅप्पी फोटोमागील स्टोरी मात्र भयानक आहे. कपलचा हा फोटो मृत्यू स कारणीभूत ठरला आहे. या फोटोने एक जीव घेतला आहे. फोटोत दिसणारं हे कपल गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड आहे. दोघंही फिरायला गेला. आता फिरणं म्हटलं की तिथल्या सुंदर ठिकाणी फोटो क्लिक करणं आलंच. या कपलनेही आपले फिरतानाचे सुंदर क्षण कॅमेऱ्यात कैद केले. पण त्यांचा या फोटोतील हा क्षण शेवटचा अविस्मरणीय पण भयानक ठरला. या फोटोत दिसणारी तरुणीने जिने आपल्या सोशल मीडियावर हा फोटो शेअर केला आहे आणि त्यामागील इमोशनल स्टोरीही सांगितली आहे.
या फोटोतील तरुण आता हयात नाही. हा फोटो काढल्यानंतर त्याचा जीव गेला. त्याने मृत्यूआधी काढलेला हा फोटो आहे. तरुणीने या फोटोला “आमचा एकत्र शेवटचा फोटो. तू नेहमी माझ्यासोबत असशील”, असं कॅप्शन दिलं आहे. हा फोटो पाहिल्यानंतर तो क्षण आठवून तिला भीती वाटते. पण असं नेमकं काय घडलं? प्रेमात हादरवणारं कृत्य! बॉयफ्रेंडसाठी गर्लफ्रेंडने कापली जीभ; धक्कादायक कारण जवळपास एक वर्षापूर्वीची ही घटना. डेलीस्टारच्या वृत्तानुसार, 30 वर्षांचा अँड्रिया मॅझेटो त्याची गर्लफ्रेंड सारा ब्रागान्टेसोबत ऑगस्टमध्ये इटलीतील रोत्झो येथील हिल स्टेशनला भेट देण्यासाठी गेली होती. जिथे एका वेदनादायक अपघाताने हादरले. अँड्रिया डोंगरावर फोटो क्लिक करत असताना त्याच्या हातातून मोबाईल पडू लागला, तो पकडण्याच्या प्रयत्नात तो घसरला आणि दरीत कोसळला. सारा मदतीसाठी आरडाओरडा करू लागली, तिने बचाव पथकाला बोलावलं पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. मृत्यूनंतरही बायकोने नवऱ्याला सोडलं नाही; 7 दिवस त्याच्या मृतदेहासोबतच…; अंगावर काटा आणणारी घटना हेलिकॉप्टरच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलं आणि अँड्रियाचा मृतदेह दरीत 330 फूट खोलात सापडला.