ब्राझिलिया, 08 एप्रिल : पती-पत्नी चं नातं अतूट, सात जन्मांचं असतं असं म्हटलं जातं. कोणत्याही परिस्थिती नवरा-बायको एकमेकांची साथ सोडत नाही. मृत्यूनंतर मी तुझा पिच्छा सोडणार नाही, असं कितीतरी बायका आपल्या नवऱ्यांना मिश्किलीने म्हणतात. पण एका महिलेने खरंच असं केलं. मृत्यूनंतरही तिने तिच्या नवऱ्याची साथ सोडली नाही. फिरायला गेले असता तिच्या नवऱ्याचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याच्या मृतदेहासोबत तिने जे केलं ते अंगावर काटा आणणारं आहे. ब्राझीलमधील ही धक्कादायक घटना आहे. मारिया आणि जोस हे एक कपल अॅमेझॉनच्या जंगलात पिकनिकसाठी गेलं होतं. 68 वर्षांची मारिया पती जोससोबत आयुष्यात पहिल्यांदाच फिशिंग ट्रिपवर गेली. समुद्रात बोटीने दोघंही प्रवास करत होते. सुट्ट्यांमध्ये एकमेकांसोबत वेळ घालवून आपलं नातं, प्रेम अधिक घट्ट होईल असं या दाम्पत्याला वाटत होतं. पण नियतीला मात्र काही वेगळंच मंजूर होतं.
अचानक जोसला हार्ट अटॅक आला. बोटीतच त्याचा मृत्यू झाला. मारियाच्या डोळ्यादेखत तिचा नवरा गेला, तडफडत त्याने जीव सोडला. अथांग समुद्राच्या मध्यभागी मारिया तिच्या पतीच्या मृतदेहासोबत बोटीवर एकटीच होती. आजूबाजूलाही कुणीच नव्हतं, कोणती बोटही दिसत नव्हती. VIDEO : नवरा-नवरीला चढला जोश, विमानातच…; प्रवाशांना वाटली लाज, नेटिझन्सही संतप्त त्याचवेळी बोटची मोटारही तुटली. त्यामुळे पॅडल मारण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. तिने बोटीतून नवऱ्याच्या मृतदेहासोबत एकटीने प्रवास सुरू केला. यादरम्यान तिला अनेक संकटांचा सामना करावा लागला. पतीचा मृतदेह सडत होता, त्यावर गिधाडं घिरट्या घालत होते. मध्ये मध्ये मगरीही आड येत होत्या. बोट चालवता चालवता ती पतीच्या मृतदेहाचंही रक्षण करत होती. तिसऱ्या दिवशी तिला समुद्रात एक माणूस दिसला. आता आपल्याला मदत मिळेल, याची आशा मारियाला होती. पण तसं झालं नाही. त्या व्यक्तीने मारियाला मदत केली नाही. बोटीतील त्यांच्याकडे असलेला अन्नसाठाही संपला होता. जिवंत राहण्यासाठी मारियाने कच्चे मासे खाल्ले, कधी पीठ खाल्लं, लिंबू रस पित होती. एक दिवस तर तिने फक्त पाणी पिऊनच काढला. असे तब्बल सात दिवस तिने घालवले. VIDEO - नवरदेव वरात घेऊन दारात अन् धावत बाल्कनीत गेली नवरी; पुढे असं काही घडलं की… अखेर सातव्या दिवशी मारिया नौदलाच्या लोकांना सापडली. त्यांनी तिच्यासह तिच्या नवऱ्याचा मृतदेहाला रुग्णालयात नेलं. आता कुठे मारिया पती गमावल्याच्या धक्क्यातून बाहेर येत आहे. तिचं कुटुंबही तिच्यासोबत आहे.