नवी दिल्ली, 07 एप्रिल : प्रेम आंधळं असतं, प्रेमात लोक वाट्टेल ते करण्यासाठी तयार असतात. काही लोक तर प्रेमात असं काही करून बसतात ज्याचा आपण स्वप्नातही विचार करणार नाही. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणीने आंधळ्या प्रेमात धक्कादायक कृत्य केलं. गर्लफ्रेंड ने आपल्या बॉयफ्रेंड साठी चक्क आपली जीभ कापली आहे. तिच्या भयंकर कृत्यामागील कारणही धक्कादायक आहे. प्रेमात काही लोक अगदी मर्यादा ओलांडतात. काही जण तर आपला जीवही धोक्यात घालतात. या तरुणीने प्रेमात जे केलं ते कमी नाही. 22 वर्षांची ही तरुणी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. तिने बॉयफ्रेंडसाठी आपली जीभ कापली. डेली स्टारच्या वृत्तानुसार तरुणीने जिभेच्या खाली असलेला भाग ज्याला लिंगुअल फ्रेनुलम म्हटलं जातं, ते काढून टाकलं आहे. सर्जरी करून तिने जिभेचा हा भाग हटवला आहे. लिंगुअल फ्रेनेक्टोमी करण्यात एक्सपर्ट असलेल्या एका डेंटिस्टकडून तिने ही सर्जरी करवून घेतली.
आता प्रेम आणि जिभेचा काय संबंध? या तरुणीने बॉयफ्रेंडसाठी जीभ का कापली? असे प्रश्न तुम्हाला पडले असतील. याचं तरुणीने जे कारण दिलं, तेसुद्धा शॉकिंग आहे. तिच्या या अजब दाव्याने सर्वांना धक्का बसला आहे. VIDEO : नवरा-नवरीला चढला जोश, विमानातच…; प्रवाशांना वाटली लाज, नेटिझन्सही संतप्त तरुणी म्हणाली, प्रेम व्यक्त करण्याच्या अनेक पद्धती असतात. कुणी मिठी मारतं, कुणी किसत करतं. हे सामान्य आहे. पण जिभेमुळे तिच्या लव्ह लाइफवर परिणाम होत होता. बॉयफ्रेंडसोबत रोमान्स करताना जिभेचा अडथळा येत होता. स्मूच करण्याच्या तिच्या क्षमतेवर परिणाम होत होता. स्मूच करताना लिंगुअल फ्रेनुलम आडवी यायची. यामुळे तिच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचत होती, तिचा आत्मविश्वास डगमगत होता. त्यामुळे तिने जिभेचा तो भाग कापण्याचाच निर्णय घेतला. ही सर्जरी केल्यानंतर आपल्याल आता पश्चाताप होतो आहे की हे आपण आधी का केलं नाही. आपला हा निर्णय आतापर्यंतचा सर्वात चांगला निर्णय होता, असंही ही तरुणी म्हणाली. 8 नातवंडांच्या आजीला चढला ‘जवानी’चा जोश; उतारवयात नको तेच केलं, झाला मृत्यू या अशा प्रेमाला काय म्हणायचं, तुम्हाला तरी हे पटतंय का? आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.