व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये जंगलात अनेक झाडं असल्याचं दिसून येतं. एक व्यक्ती झाडाची साल कापून काढताच तिथून पाण्याचा जोरदार प्रवाह वाहू लागतो. पाणी इतकं स्वच्छ आहे की तो ते पिण्यास सुरुवात करतो. या झाडाचं नाव Terminalia tomentosa आहे. ज्याला सामान्यतः क्रोकोडाइल बार्क ट्री असंही म्हणतात. हे झाड भारताच्या काही भागात आढळतं. या झाडाची उंची 30 मीटरपर्यंत असू शकते. विशेष म्हणजे या झाडाच्या खोडामध्ये भरपूर पाणी भरलेलं असतं. जे शुद्ध आणि पिण्यायोग्य आहे. 625 मुलांसाठी अवघ्या 190 मुली; लग्नासाठी मुलगी मिळेना म्हणून पंचायतीने काढला हा तोडगा या झाडाला खूप महत्व आहे. वृक्षाच्या वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट्यांमुळे बौद्ध लोक त्याला बोधीवृक्ष असेही म्हणतात. झाडाचा हा व्हिडिओही लोकांच्या पसंतीस उतरला आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ 1 लाखहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. त्याचबरोबर या व्हिडिओला हजारो लोकांनी लाइकही केलं आहे. या व्हिडिओवर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देत आहेत.WOW!
This Indian 🇮🇳 'Water Tree' Can Quench Your Thirst From enlightening Tissa Budhha to being a natural clean water kiosk, this tree is a true miracle. pic.twitter.com/bmjqcI7PYB — Erik Solheim (@ErikSolheim) April 13, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Tree, Video Viral On Social Media