मराठी बातम्या /बातम्या /Viral /

625 मुलांसाठी अवघ्या 190 मुली; लग्नासाठी मुलगी मिळेना म्हणून पंचायतीने काढला हा तोडगा

625 मुलांसाठी अवघ्या 190 मुली; लग्नासाठी मुलगी मिळेना म्हणून पंचायतीने काढला हा तोडगा

मुलींचा दुष्काळ पाहून पंचायतीने काढला हा तोडगा

मुलींचा दुष्काळ पाहून पंचायतीने काढला हा तोडगा

मुलींचा दुष्काळ पाहून पंचायतीने काढला हा तोडगा

जळगाव, 13 एप्रिल : मुलींचा जन्मदर गेल्या काही काळात खूप घटला आहे. त्यामुळे अनेक मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत. अशात लग्नासाठी इच्छुक असलेल्या मुलींच्या आपल्या भावी वराकडून असणाऱ्या अपेक्षा खूपच वाढल्या आहेत. त्यामुळे सामान्य कुटुंबांतील मुलांचं लग्न होणं आणखीनच अवघड झालं आहे. महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील एका गावामध्ये या समस्येमुळे खूप लोक त्रस्त आहेत. पाटिदार समाजामधील (Patidars) आणखी एक जात म्हणजेच लेवा पाटील हा समाज (Leva Patil community) या समस्येने ग्रस्त आहे. या गावात जवळपास निम्मे तरुण 30 पेक्षा जास्त वयाचे असूनही, अद्याप अविवाहित (Unmarried) आहेत. या गावात विवाहेच्छुक पुरुषांची संख्या संभाव्य वधूंपेक्षा खूप जास्त आहे. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ भागातील लेवा पाटील पंचायतीने या समस्येवर उपाय म्हणून एक तोडगा काढला आहे. या लोकांनी येथील अविवाहित तरुणांची अनाथाश्रमातील (Orphanage) मुलींशी लग्न लावण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या मुलींच्या सामाजिक सुरक्षिततेची हमी मिळावी म्हणून वरांना एका अटीची पूर्तता करावी लागेल. ती म्हणजे वराने त्याच्या संपत्तीतील 30 ते 50% संपत्ती विवाह सोहळ्यापूर्वी वधूच्या नावे करावी. या मुली ज्या अनाथाश्रमांतील आहेत त्यांच्या वतीने ही मागणी केली जाते. गेल्या अनेक दिवसांपासून भोरगाव लेवा पाटील समाजातील लोकांना आपल्या मुलांसाठी वधू मिळणं खूप अवघड झालं आहे. विशेष म्हणजे या वर्षी 190 मुलींनी लग्नासाठी नोंदणी केली आहे मात्र त्यांच्याशी लग्न करण्यास इच्छुक असलेल्या भावी वरांची संख्या 625 एवढी आहे. गेल्या काही वर्षांपासून वधू-वरांच्या संख्येत मोठी तफावत निर्माण झाली आहे. पंचायतीने घेतलेल्या निर्णयानुसार अनाथाश्रमातील महिलांचे पालकत्व स्वीकारून त्यांचे लग्न समाजातील तरुणांशी करून दिले जाईल. जवळच असलेल्या चाळीसगाव येथे या पूर्वी असे विवाह लावण्यात आले आहेत. हे ही वाचा-VIDEO: लग्नाच्या स्टेजवर नवरदेव भलत्याच कामात झाला मग्न; भडकलेल्या नवरीने मंडपातच घडवली अद्दल 30 ते 50% संपत्ती करावी लागते वधूच्या नावे कायदेशीर परवानगी मिळाल्यास अनाथाश्रमातील महिलांचा विवाह लेवा पाटील समाजातील तरुणांशी होऊ शकतो. मात्र त्यापूर्वी वराच्या संपत्तीपैकी 30 ते 50% संपत्ती वधूच्या नावे करावी लागते. लग्नानंतर मुलीला काही त्रास होऊ नये किंवा काही भांडण तंटे झाल्यास वधूच्या भविष्यातील सुरक्षिततेसाठी आणि उदरनिर्वाहासाठी या अटीची पूर्तता करावी लागते. ही अट पूर्ण झाली तरच हा विवाह होऊ शकतो. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी एक अभ्यास केला जात आहे. यामध्ये अशा प्रकारच्या विवाहातील कायदेशीर बाबी समजून घेतल्या जात आहेत. तसेच अशा अनाथाश्रमांची माहितीदेखील गोळा केली जात आहे. लेवा पाटील समाजाचे सदस्य मे महिन्यात वर्धा, औरंगाबाद आणि राजस्थान येथील अनाथाश्रमात जाऊन संस्थांच्या प्रमुखांशी याबाबत चर्चा करणार आहेत.
First published:

Tags: Jalgaon, Marriage

पुढील बातम्या