जाहिरात
मराठी बातम्या / Viral / 40 सेकंद मृत्यूशी सामना करत होती आई; अंड्यातली पिल्ले वाचवण्यासाठी पत्करला धोका आणि...

40 सेकंद मृत्यूशी सामना करत होती आई; अंड्यातली पिल्ले वाचवण्यासाठी पत्करला धोका आणि...

40 सेकंद मृत्यूशी सामना करत होती आई; अंड्यातली पिल्ले वाचवण्यासाठी पत्करला धोका आणि...

आईच्या प्रेमावर (Mother Love) कोणीच संशय घेऊ शकत नाही. आईच्या प्रेमाची तुलनाही कशासोबतच केली जाऊ शकत नाही. आई प्रथम आपल्या बाळाला पोटात वाढवते. यानंतर ते बाळ जगात आल्यानंतर त्याला काय हवं नको ते सगळं अगदी प्रेमानं करते.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    मुंबई, 14 एप्रिल : आईच्या प्रेमावर (Mother Love) कोणीच संशय घेऊ शकत नाही. आईच्या प्रेमाची तुलनाही कशासोबतच केली जाऊ शकत नाही. आई प्रथम आपल्या बाळाला पोटात वाढवते. यानंतर ते बाळ जगात आल्यानंतर त्याला काय हवं नको ते सगळं अगदी प्रेमानं करते. बाळाला सांभाळताना आईला खूप संयमाने आणि जबाबदारीने आईपण पेलावं लागतं. आई कायम आपल्या मुलांचा विचार करत असते. तिची कितीही वेगवेगळी कामं, कमिटमेंट्स असली किंवा कितीही माणसांचा गोतावळा असला, तरी आईचं जग केवळ आपल्या मुलांभोवतीच फिरत असतं. मुलांच्या जेवणाची, त्यांच्या तब्येतीची सर्वात जास्त काळजी आई घेत असते. माणूस असो किंवा प्राणी, प्रत्येक आईच्या हृदयातली माया सारखीच असते. आईच्या प्रेमाची ताकद दर्शवणारा एका मादी पक्ष्याचा (Female Bird) व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. ही मादी शेतात बसून अंडी उबवत होती; मात्र तितक्यात तिथं ट्रॅक्टर येतो आणि तो मादी आणि तिच्या अंड्यांवरून जातो. हा संपूर्ण व्हिडिओ पाहताना कोणाच्याही मनाचा थरकाप उडेल. व्हिडिओमध्ये दिसत आहे, की एक मादी पक्षी शेतात बसून आपली अंडी उबवत होती; मात्र तेवढ्यात त्यावरून एक ट्रॅक्टर जाऊ लागतो. जेव्हा ट्रॅक्टर त्या पक्ष्याच्या जवळ जवळ येतो, तेव्हा ती पक्षी आपले पंख पसरवून आपल्या अंड्यांवर पांघरते. त्यानंतर तो ट्रॅक्टर हळू हळू त्यांच्यावरून अलगद निघून जातो. सुदैवाने तो ट्रॅक्टर पक्ष्याला किंवा अंड्यांना चिरडून जात नाही; मात्र हा व्हिडिओ प्रत्येकाचं मन नक्कीच हेलावून टाकतो. आपलाही जीव धोक्यात आहे कळल्यावरसुद्धा ती आई आपल्या अंड्यांपासून जरादेखील बाजूला झाली नाही. तिने धाडसाने मृत्यूशी सामना केला आणि त्याला हरवलं. या आईच्या धाडसाला सलाम. हा 40 सेकंदांचा व्हिडिओ पाहून व्ह्यूअर्स आश्चर्यचकित झाले आहेत. फेसबुकवर मदर अर्थ (Mother Earth) नावाच्या पेजवर हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. प्रसंगी आपला जीव धोक्यात घालून मुलांचा जीव वाचविणाऱ्या आईच्या अनेक गोष्टी ऐकल्या असतील. पक्ष्याच्या रूपातली आईदेखील आपल्या अपत्यांवर किती प्रेम करते हे या व्हिडिओमध्ये दिसतं. अत्यंत हृदयस्पर्शी अशा या व्हिडिओवर आतापर्यंत अनेकांनी खूप कमेंट्स केल्या आहेत. एका व्यक्तीने लिहिलं आहे, की ‘या आईला अनेक आशीर्वाद. ट्रॅक्टर पाहून या मादी पक्ष्यालादेखील भीती वाटली असणार; मात्र तिने एका क्षणासाठीही आपल्या पिलांना एकटं सोडलं नाही. ती शेवटपर्यंत त्यांच्यासोबत राहिली. जेव्हा ट्रॅक्टर त्यांच्यावरून पूर्णपणे निघून गेला, तेव्हाच तिने आपल्या पिलांवरचे आपले पंख बाजूला केले.’ या व्हिडिओला खूप पसंती मिळत आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात