Home /News /viral /

चालत्या ट्रेनमधून कोसळली महिला; रेल्वेखाली जाणार इतक्यात अवतरला 'देवदूत', Shocking Video

चालत्या ट्रेनमधून कोसळली महिला; रेल्वेखाली जाणार इतक्यात अवतरला 'देवदूत', Shocking Video

रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) दक्ष जवानांनी बुधवारी एका प्रवाशाचा जीव वाचवला. रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म आणि ट्रेनमधील गॅपमध्ये पडलेल्या एका महिला प्रवाशाला आरपीएफचे हेड कॉन्स्टेबल एस मुंडा यांनी वाचवलं

    नवी दिल्ली 12 मे : दुर्घटना कधी आणि कोणासोबत घडेल, हे कोणीही सांगू शकत नाही. मात्र बऱ्याचदा मोठ्या अपघातांमधूनही लोक अगदी थोडक्यात बचावल्याचं पाहायला मिळतं. देव तारी त्याला कोण मारी, ही म्हण खरी सिद्ध करणाऱ्या अनेक घटना आपल्या आजूबाजूला घडतात. अशीच एक घटना नुकतीच ओडिशाच्या भुवनेश्वर रेल्वे स्थानकावर (Bhubaneswar Railway station) पाहायला मिळाली. यात प्लॅटफॉर्मवर एक महिला धावत्या ट्रेनमधून कोसळली (Woman Fell from Train). मात्र सुदैवाने यात तिचा जीव वाचला. बाईकला धडक देणाऱ्या महिला कार चालकासोबत तरुणाचं शॉकिंग कृत्य; हैराण करणारा VIDEO रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) दक्ष जवानांनी बुधवारी एका प्रवाशाचा जीव वाचवला. रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म आणि ट्रेनमधील गॅपमध्ये पडलेल्या एका महिला प्रवाशाला आरपीएफचे हेड कॉन्स्टेबल एस मुंडा यांनी वाचवलं. सरस्वती असं या ५८ वर्षीय महिलेचं नाव आहे. हेड कॉन्स्टेबलच्या सतर्कतेमुळे या महिलेचे प्राण वाचले अन्यथा ती ट्रेनखाली येण्याची शक्यता होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरस्वती या आंध्र प्रदेशातील इच्छापूर भागातील आहेत. पलासा-कटक मेमू पॅसेंजर (18444) ट्रेनमधून उतरताना त्या पडल्या. या घटनेचा व्हिडिओ काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाला. ट्रेनमधून खाली उतरताना सरस्वती यांच्यासोबत आणखी एक महिलाही पडली. ही घटना बुधवारी 11 मे रोजी सकाळी 10.10 च्या सुमारास स्थानकाच्या फलाट क्रमांक 3 वर घडली. मासे पकडताना अचानक पाण्यातून बाहेर आली मगर आणि...; अंगावर काटा आणणारा VIDEO "आरपीएफ हेड कॉन्स्टेबल एस मुंडा यांनी भुवनेश्वर रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर पलासा-कटक पॅसेंजर ट्रेनमधून उतरताना घसरलेल्या एका महिला प्रवाशाचा जीव वाचवला," असं रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलं. रेल्वे आणि तटीय सुरक्षा अतिरिक्त पोलीस महासंचालक सुधांशू सारंगी यांनीही घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ शेअर केला आहे. या धाडसी पाऊलाबद्दल त्यांनी मुंडा यांचं कौतुक केलं. सुधांशू यांनी लिहिलं, 'भुवनेश्वर रेल्वे स्थानकावर आरपीएफचे हेड कॉन्स्टेबल सुनeराम मुंडा यांचं कौतुकास्पद काम. त्यांनी एका महिला प्रवाशाचे प्राण वाचवले.'
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Indian railway, Shocking video viral, Train accident

    पुढील बातम्या