Home /News /viral /

मासे पकडताना अचानक पाण्यातून बाहेर आली मगर आणि...; अंगावर काटा आणणारा VIDEO

मासे पकडताना अचानक पाण्यातून बाहेर आली मगर आणि...; अंगावर काटा आणणारा VIDEO

गळाला मासा लागला पण सोबतच मगरही त्याच्या मागे मागे आली. हा संपूर्ण थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

  कॅनबेरा, 11 मे : काही लोकांना मासे पकडायला आवडतं. मासे पकडणं हीसुद्धा एक कला आहे. शिवाय नशीबाने साथ दिली तर चांगला मासा जाळ्याला लागतो नाहीतर रिकाम्या हातीच परतावं लागतं. पण एका व्यक्तीच्या जाळ्यात मासा तर अडकला पण सोबतच मगरही (Crocodile video) अडकली. आता माशासोबत मगरही जाळ्यात अडकली तर त्या व्यक्तीची काय अवस्था झाली असेल हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. यानंतर पुढे जे घडलं ते थरकाप उडवणारं आहे (Man encounter with crocodile while fishing). ऑस्ट्रेलियाच्या (Australia) काकाडूतील ही घटना. चेल्स क्रॉसिंगमधील एका तलावात स्कॉट रॉसकेरल (Scott Roscarel)  नावाचा मच्छिमार आपल्या वडिलांसोबत मासे पकडायला गेला. दोघीही तलावाजवळ एका उंच ठिकाणावर उभं राहून फिशिंग करत होते. स्कॉटच्या हातात फिशिंग रॉड होतं. ते त्याने तलावात टाकलं. बऱ्याच वेळानंतर एक मासा गळाला लागला. स्कॉटने फिशिंग रॉड खेचलं पण माशासोबत मगरही आली (Man fight crocodile while fishing video). हे वाचा - OMG! चक्क माकडांनी सुसाट पळवली Bike; Rider Monkeys चा Video पाहून थक्क व्हाल स्कॉटने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर याचा व्हिडओही पोस्ट केला आहे. व्हिडीओत पाहू शकता स्कॉट वेगाने माशाला आपल्याकडे खेचतो. त्याच्या मागे पाण्यात मगरही पोहोत येताना दिसते. मगरही त्या माशाला पकडत असावी आणि त्यामुळेच स्कॉटने त्या माशाला खेचताच संतप्त मगरही त्या माशाच्या मागेमागे आली. मगर जवळ येणार तोच स्कॉटची टोपीही तिथंच पडली. त्याच्या वडिलांनी टोपी उचलण्याचा प्रयत्न केला. अखेर ती टोपी उचलली आणि ते तिथून पटकन बाजूले झाले.
  व्हिडीओ ऐकला तर त्यात कुणीतरी मगरीला मासा खायला द्या, असं या दोघांना सांगतानाही दिसतं आहे. पण दोघंही तो मासा मिळवण्यात यशस्वी होतात. हे वाचा - ऑगस्टमध्ये अचानक 20 लाख लोक होणार गायब! Time traveller चा खळबळजनक दावा हा व्हिडीओ पाहून सर्वजण शॉक झाले आहेत. बहुतेकांनी हा भयावह व्हिडीओ असल्याचं म्हटलं आहे. कमेंटमध्ये युझर्सनी स्कॉटला या मगरीबाबतही काही प्रश्न विचारले आहेत. त्यानुसार ही मगर 8 फूट लांब असावी असं सांगितलं आहे. तसंच त्यावेळी आपण मगरीच्या किती जवळ होतो, याची आपल्याला तेव्हा कल्पना नव्हती. पण हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आपल्याला धडकी भरली, असंही स्कॉटने कमेंटमध्ये रिप्लाय देताना सांगितलं आहे.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Crocodile, Viral, Viral videos, Wild animal

  पुढील बातम्या