Home /News /viral /

बाईकला धडक देणाऱ्या महिला कार चालकासोबत तरुणाचं शॉकिंग कृत्य; हैराण करणारा VIDEO

बाईकला धडक देणाऱ्या महिला कार चालकासोबत तरुणाचं शॉकिंग कृत्य; हैराण करणारा VIDEO

कारने बाईकला धडक देताच बाईकस्वाराने ती कार चालवणाऱ्या महिलेसोबत भररस्त्यात असं काही केलं की तुम्हाला तुमच्या डोळ्यांवरही विश्वास बसणार नाही.

  मुंबई, 11 मे : एका गाडीने दुसऱ्या गाडीला धडक दिल्याचे बरेच व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. अशा घटना तुमच्यासमोर प्रत्यक्षातही घडल्या असतील. अशावेळी साहजिकच गाडीचालकांचे आपसात वाद, भांडणं होतात. काही वेळा तर प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचतं. पण सध्या सोशल मीडियावर असा व्हिडीओ व्हायरल होतो आहे जो पाहून तुम्ही हैराण व्हाल. एक कार बाईकला धडकल्यानंतर बाईक चालकाने त्या कारच्या महिला ड्रायव्हरसोबत भररस्त्यात जे केलं ते पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवरही विश्वास बसणार नाही (Car Hit bike video). बाईकला धडक देणाऱ्या महिला कार ड्रायव्हरसमोबत बाईक चालवणाऱ्या तरुणाने भररस्त्यात असं काही केलं ही पाहणारा प्रत्येक जण हैराण झाला आहे. असंह कुणी काही करू शकेल हे पाहून तुम्हाला आश्चर्यच वाटेल. या कारणामुळेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे (Man Hugged Woman Who Hit Him). व्हिडीओत पाहू शकता काही गाड्या उभ्या दिसत आहेत. एक तरुण आपली बाईक एका ठिकाणी उभी करून मागे चालत येताना दिसतो. तो एका कारजवळ येतो. या कारच्या बाहेर एक महिला उभी दिसते आहे. व्हिडीओ पोस्ट करताना दिलेल्या माहितीनुसार या महिलेच्या कारने त्या तरुणाच्या बाईकला धडक दिली आहे. हे वाचा - चालकाशिवाय आपोआप चालू लागली पार्किंगमधील बाईक; Horror film मधील नाही हा रिअल Shocking video महिलेच्या चेहऱ्यावर भीती दिसते आहे. आपल्या कारची बाईकला धडक बसल्यानंतर ही महिला घाबरली आहे. आता काय होईल या विचाराने ती थरथर कापतानाही दिसते आहे. तरुण तिच्याजवळ येईपर्यंत तिच्या चेहऱ्यावर भीती दिसते आहे.
  पण तरुण तिच्याजवळ येऊन तिला ओरडत नाही, तिच्यावर भडकत नाही किंवा तिच्यासोबत वाद घालत नाही. तिची अवस्था पाहून तो तिला धीर देतो आहे. तरुण तिला एक जादू की झप्पी देतो म्हणजेच मिठी मारतो. तेव्हा कुठे तिच्या चेहऱ्यावरील भीती गायब होते. ती शांत होते आणि आणि  हसू लागते. हे वाचा - मासे पकडताना अचानक पाण्यातून बाहेर आली मगर आणि...; अंगावर काटा आणणारा VIDEO तिथंच गाडीत असलेल्या एका व्यक्तीने हे सर्वकाही आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केलं. goodnews_movement नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तो पाहिल्यानंतर अशा परिस्थितीतही तरुणाने गांधीगिरी दाखवल्याने सर्वजण त्याचं कौतुक करत आहेत. त्याचा हा अंदाज सर्वांना आवडला आहे.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Viral, Viral videos

  पुढील बातम्या