नवी दिल्ली 14 सप्टेंबर : अनेकदा आपण तरुण कपलचं खुलणारं प्रेम (Love) बघतो. मात्र, प्रेमाला वयाचं बंधन नसतं. हे प्रेम कोणत्याही वयात होऊ शकतं, पण प्रेम व्यक्त करताना लोकांना अक्षरशः घाम फुटतो. काही लोक लगेच आणि सर्वांसमोरच आपलं प्रेम व्यक्त करतात. तर, काही लोकांना प्रेम व्यक्त करायला बराच वेळ लागतो. तुम्ही अनेकदा विवाहित जोडप्यांनाही आपलं प्रेम व्यक्त करताना पाहिलं असेल मात्र वृद्धांनी सर्वांसमोर आपलं प्रेम व्यक्त केल्याचं खूप कमी वेळा पाहायला मिळतं. लग्नमंडपातच नवरदेव-नवरीची मस्ती; VIDEO चा शेवट पाहून आवरणार नाही हसू सोशल मीडियावर (Social Media) सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video of Couple) होत आहे. यात एक आजी-आजोबा जमिनीवर बसून आनंदाचे काही क्षण एकमेकांसोबत घालवत असल्याचं पाहायला मिळतं. हा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. काहीच सेकंदाचा हा व्हिडिओ लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. व्हिडिओमध्ये एक वृद्ध कपल बसलेलं दिसतं. इतक्यात यातील आजीबाई आपल्या पतीच्या जवळ जात त्यांच्या गालावर किस करताना दिसते. यानंतर आजोबा लाजतात आणि खाली पाहू लागतात.
कबुतरांच्या प्रेमात आकंठ बुडाली आहे ही महिला; वर्षाला खर्च करते लाखो रुपये आजीबाईच्या चेहऱ्यावरील हसू मन जिंकणारं आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. इन्स्टाग्रामवर (Instagram Reels) केथम्मा अव्वा नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ अपलोड केला गेला आहे. हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या इतका पसंतीस उतरत आहे की आतापर्यंत 60 लाख जणांनी व्हिडिओ लाईक केला आहे. तर, करोडो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. अनेकांनी यावर कमेंट करत आपली प्रतिक्रियाही दिली आहे.