मराठी बातम्या /बातम्या /Viral /बापरे! कबुतरांच्या प्रेमात आकंठ बुडाली आहे ही महिला; वर्षाला 2 पक्षांवर खर्च करते लाखो रुपये

बापरे! कबुतरांच्या प्रेमात आकंठ बुडाली आहे ही महिला; वर्षाला 2 पक्षांवर खर्च करते लाखो रुपये

महिलेकडे दोन कबूतर (pigeons) आहेत आणि तिचं त्यांच्यावर इतकं प्रेम (Bird Lover) आहे की त्यांच्यासाठीच ती दरवर्षी लाखो रुपये खर्च करते.

महिलेकडे दोन कबूतर (pigeons) आहेत आणि तिचं त्यांच्यावर इतकं प्रेम (Bird Lover) आहे की त्यांच्यासाठीच ती दरवर्षी लाखो रुपये खर्च करते.

महिलेकडे दोन कबूतर (pigeons) आहेत आणि तिचं त्यांच्यावर इतकं प्रेम (Bird Lover) आहे की त्यांच्यासाठीच ती दरवर्षी लाखो रुपये खर्च करते.

नवी दिल्ली 14 सप्टेंबर : माणूस आणि प्राणी यांच्यातील प्रेमाचं नातं अगदी जुनं आहे. बऱ्याच काळापासून माणसं प्राणी आणि पक्षी पाळतात आणि त्यांना आपल्या घरातच ठेवून त्यांची काळजी घेतात. बहुतेकदा लोक कुत्रा, मांजर, गाय, बकरी असे प्राणी पाळतात. मात्र, बरेच लोक असेही असतात ज्यांना पक्षी पाळण्याचीही आवड असते. पक्षांवर विशेष प्रेम असणारी एक महिला सध्या चांगलीच चर्चेत आहे. या महिलेकडे दोन कबूतर (Pigeons) आहेत आणि तिचं त्यांच्यावर इतकं प्रेम (Bird Lover) आहे की त्यांच्यासाठीच ती दरवर्षी लाखो रुपये खर्च करते.

'साहेब, मला एकही मुलगी पटत नाही', GF साठी पठ्ठ्याने थेट आमदारालाच लिहिलं पत्र

इंग्लंडच्या (England) लिंकनशायर येथे राहणारी 23 वर्षीय मेगी जॉन्सन (Meggy Johnson) हिचं कबूतरांवर विशेष प्रेम आहे. यामुळे तिनं आपल्या घरातच दोन कबूतर (Pet Pigeons) पाळले आहेत. जेव्हा हे दोन्ही कबूतर अतिशय लहान होते तेव्हाच ते मेगीला कुठेतरी पडलेले आढळले होते. मेगीला या कबूतरांची दया आली आणि तिनं त्यांना पाळण्याचा निर्णय घेतला. मेगीनं या कबूतरांची नावं स्काय आणि मूस अशी ठेवली आणि सहा आठवड्यापर्यंत त्यांना आपल्या हातानंच खाऊ घातलं. यादरम्यान मेगीनं दोघांचीही भरपूर काळजी घेतली. आता दोन्ही कबूतर मोठे झाले असून मेगी त्यांच्यावर भरपूर पैसे खर्च करते आणि माणसांप्रमाणेच त्यांची काळजी घेते.

लग्नातच नवरीबाईला 'जोर का झटका'! नवरदेवाचं 'ते' कृत्य पाहून उडालीच; VIDEO VIRAL

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, मेगी आपल्या कबूतरांवर दरवर्षी 4 लाखाहून अधिक पैसे खर्च (Woman Spends 4 Lakh Rupees Per Year on Pigeons) करते. ती कबूतरांसाठी खास कपडे मागवते आणि तिनं त्यांना राहण्यासाठी लहानसं घर आणि बेडही बनवून घेतलं आहे. मेगी या दोघांचा वाढदिवसही साजरा करते आणि त्यांना गिफ्टही देते. अनेकजण मेगीला या गोष्टींसाठी वेड्यात काढतात. मात्र, आपल्याला यानं काहीच फरक पडत नसल्याचं तिनं सांगितलं. कबूतरांकडे स्वतःचे जवळपास सतरा कपडे आहेत आणि खेळण्यासाठी त्यांच्याकडे सॉफ्ट टॉयदेखील आहेत. मेगीनं सांगितलं, की ती आपल्या कबूतरांना बाहेर फिरण्यासाठीही घेऊन जाते. मेगीनं स्काय नावाच्या कबूतराला 2019 मध्ये वाचवलं होतं. तर, मूसला तिनं याच वर्षी मे महिन्यात वाचवलं आहे. मेगीनं सांगितलं, की अनेकदा तर तिनं केवळ एका महिन्यातच या कबूतरांवर 40 हजार रुपयांहून अधिक खर्च केला होता.

First published:
top videos

    Tags: Pet animal, Viral news