मुंबई, 08 फेब्रुवारी : प्रेमाच्या आठवड्याला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे. रोज डेने या विकची सुरुवात झाली आहे. तर या प्रेमाच्या महिन्यात आज आपण एक अशा राजकारणातील प्रेमी कहाणीबद्दल बोलणार आहोत. ज्याबद्दल फार कमी लोकांना ठावूक असेल.
तुम्ही इंदिरा आणि फिरोज गांधी, तसेच राजीव आणि सोनिया गांधी यांच्या प्रेम कहाणीबद्दल तुम्ही बरंच ऐकलं असणार, अनेकांना याचे किस्से देखील माहित आहे. पण तुम्हाला प्रियांका गांधी आणि रोबर्ट वड्रा यांच्या प्रेम कहाणीचे किस्से माहितीय? दोघांचीही लव स्टोरी कोणत्याही बॉलिवूड कहाणीपेक्षा कमी नाही.
हे ही पाहा : Valentine Week : राजकारणातील 'या' गाजलेल्या प्रेम प्रकरणाबद्दल तुम्हाला माहितीय?
खरंतर प्रियांका गांधी वयाच्या १३व्या वर्षी रॉबर्ट वड्रा यांना पहिल्यांदा भेटल्या होत्या. तेव्हा त्यांची ओळख खाली. नंतर हळूहळू ते एकमेकांना पसंत करु लागले.
प्रियांकाच्या साधेपणाने रॉबर्टला खूप आकर्षित केले. हळुहळु दोघांचे बोलणे सुरु झाले. दोघांचे नाते अधिक घट्ट झाले आणि नंतर त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. रॉबर्ट वड्रा हे व्यवसायीक कुटुंबातील असल्यामुळे अनेक कामांसाठी त्यांची गांधी घराण्यात ये-जा असायची. तेव्हा त्यांची प्रियांकाशी मैत्री आणखी घट्ट झाली.
एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत रॉबर्ट म्हणाले होते की, 'आमच्या नात्याबद्दल कुणालाही कळू नये अशी माझी इच्छा होती, कारण लोकांना आमचं नातं समजणार नाही आणि ते त्याला वेगळंच रूप देतील.'
प्रियांकाला रॉबर्ट वड्रा यांनी कसं प्रपोज केलं असं विचारलं असता. रॉबर्ट म्हणाले की त्यांनी कधीही घुडघ्यांवर बसुन प्रियांकाला प्रपोज केलंच नाही. त्या दोघांनीही एकत्र बसून आपल्या नात्याचा गंभीरपणे विचार केला.
जेव्हा दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला तेव्हा घरच्यांची संमती नव्हती.
असे म्हटले जाते की रॉबर्टचे वडील या नात्याबद्दल खूश नव्हते, परंतु नंतर त्यांनी देखील या लग्नाला सहमती दिली. त्यानंतर फेब्रुवारी 1997 मध्ये दोघांनी लग्न केले. दोघांना आता एक मुलगी आणि एका मुलगा आहे.
रॉबर्ट सांगतात की, प्रियांका मुलांची बहुतांश जबाबदारी सांभाळते. तर घरचा सर्व खर्च ते स्वत: उचलतात आणि सर्व नवऱ्यांप्रमाणे ते आवर्जून बायकोचं बोलणं देखील खातात.
प्रेम कहाणी नक्की कशी सुरु झाली?
प्रियंका गांधी यांनी रॉबर्ट वाड्रा यांची एका कॉमन फ्रेंडच्या घरी भेट झाली.
दोघेही दिल्लीच्या ब्रिटिश स्कूलमध्ये एकत्र शिकायचे.
प्रियांका देशातील आघाडीच्या राजकीय घराण्यातील आणि रॉबर्ट एका व्यापारी कुटुंबातील होते.
रॉबर्ट वाड्रा यांना आलिशान कार आणि बाइक्सचा शौक आहे
आलिशान कार आणि बाइक्सचे शौकीन असण्यासोबतच वाड्रा हे फिटनेस फ्रीक देखील आहेत.
डिसेंबर 2011 मध्ये एका इंग्रजी वृत्तपत्राने रॉबर्ट वाड्रा यांना 'बेस्ट ड्रेस्ड मॅन' ही पदवी दिली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Priyanka gandhi, Social media, Valentine Day, Valentine week, Viral