राजीव गांधी आणि सोनिया गांधी
आपल्या सर्वांना माहित असलेल्या कोणत्याही राजकारण्याची सर्वात आणि गाजलेली जुनी प्रेमकहाणी आहे राजीव आणि सोनिया गांधी यांची. राजीव गांधी प्रथम सोनिया गांधींना केंब्रिज विद्यापीठातील ग्रीक रेस्टॉरंटमध्ये भेटले, तेव्हा ते पहिल्या भेटीतच सोनिया यांच्या प्रेमात पडले. राजीव हे सोनिया गांधी यांना ‘मला माहित असलेली सर्वात सुंदर स्त्री’(the most beautiful woman I know)म्हणून हाक मारायचे. अँटोनी, ग्रीक रेस्टॉरंटचे मालक यांनी सांगितले की त्यांची लवस्टेरी एखाद्या पुस्तकासारखी होती.
सचिन पायलट आणि सारा अब्दुल्ला सचिन यांचं जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांची मुलगी सारा अब्दुल्ला हिच्या प्रेमात पडले. त्या दोघांची भेट लंडनला झाली. अनेक वर्षे डेट केल्यानंतर अखेर जेव्हा त्यांनी लग्नाची इच्छा व्यक्त केली तेव्हा त्यांना दोन्ही घरच्यांचा जोरदार विरोध झाला. सर्व विरोध आणि नकारांच्या दरम्यान, सचिन पायलट आणि सारा अब्दुल्ला यांनी 4 जानेवारी 2004 रोजी दिल्लीत लग्न केले. या दोघांना आरन आणि वेहान अशी दोन मुलं आहेत.
अखिलेश यादव आणि डिंपल याद
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि त्यांची खासदार पत्नी डिंपल यादव यांच्या प्रेमकथेने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, जुनं प्रेम कधीही संपन नाही. सुमारे 13 वर्षांपासून अखिलेश डिंपल प्रेमात होते. डिंपल त्यावेळी लखनऊ विद्यापीठात ह्युमॅनीटीचे शिक्षण घेत होत्या, तर अखिलेश नुकतेच ऑस्ट्रेलियात शिक्षण घ्यायला गेले. तिथून ते एकमेकांना पत्र लिहायचे. त्यानंतर पुन्हा भारतात येऊन या दोघांनी आपल्या घरच्यांच्या संमतीने लग्न केलं.
रॉबर्ट वड्रा आणि प्रियांका गांधी
प्रियंका गांधी आणि रॉबर्ट वड्रा पहिल्यांदाच दिल्लीत भेटले. त्या दिवसांत, पितळ्याची भांडी आणि कृत्रिम दागिन्यांच्या व्यवसायात असलेला रॉबर्ट प्रियांकाला वारंवार भेटत असत आणि त्यांला दागिन्यांच्या प्राचीन वस्तू भेट देत असे. जेव्हा रॉबर्ट यांनी प्रियांकाला प्रपोज केलं तेव्हा त्या प्रभावित झाल्या होत्या, कारण त्या दिवसापर्यंत त्यांच्या कोणीही इतकं जवळ आलं नव्हतं किंवा इतकं धाडस दाखवलं नव्हतं. अखेर त्यांनी 1997 मध्ये जनपथ येथे फार कमी लोकांसह लग्न केले.
दिग्विजय सिंग आणि अमृता राय या दोघांनीही प्रेमात राजकीय कारकीर्द आणि सामाजिक स्थितीची पर्वा केली नाही. काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग आणि पत्रकार अमृता राय यांचे प्रेम हे सर्वांसाठीच आश्चर्यचकित करणारे होते. सार्वजनिकरित्या एकमेकांवरील प्रेमाची कबुली दिल्यानंतर, दोघांनी सप्टेंबर 2015 मध्ये लग्न देखील केलं.
शशी थरूर आणि सुनंदा पुष्कर केंद्रीय मंत्री शशी थरूर यांचे बिझनेस वुमन सुनंदा पुष्कर यांच्याशी प्रेमसंबंध होते, त्यांची प्रेम कहाणी देशभर गाजली. थरूर आणि सुनंदा यांनी ऑगस्ट 2010 मध्ये केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील त्यांच्या वडिलोपार्जित घरी लग्न केले. परंतु वयाच्या 52 वर्षीय जानेवारी 2014 मध्ये सुनंदा यांचा मृत्यू झाला, ज्यानंतर शशी थरुर आता एकटेच आपलं आयुष्य जगत आहेत.