मुंबई 11 डिसेंबर : रेल्वे क्रॉसिंग दरम्यान अपघाताचे व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच समोर येतात. यांमध्ये काही लोक किरकोळ जखमी होतात. तर अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. जो पाहून तुमच्या अंगावर काटा उभा राहिल. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की कशी एका ट्रक वाल्यामुळे कार रेल्वे रुळाच्या अगदी मधोमध येऊन थांबली आणि तेवढ्यात समोरुन ट्रेन देखील आली. हे ही पाहा : ‘‘वो स्त्री है कुछ भी कर सकती है’’, बसमध्ये चढणाऱ्या तरुणीचा Video एकदा पाहाच ट्रेन नुकतीच येणार होती वास्तविक, हा व्हिडिओ एका युजरने शेअर केला आहे. हा सीसीटीव्ही व्हिडीओ असून व्हिडीओमध्ये लिहिलेली भाषा पाहता हा परदेशी व्हिडीओ आहे. तेथे रेल्वे क्रॉसिंगवर ट्रेन येत असल्यामुळे गेट लावले गेले आहे. त्यामुळे एक कार देखील थांबली होती. पण तितक्यात मागून एक ट्रक देखील आला. जो हळूहळू त्या कारला ढकलून रेल्वे रुळावर घेऊन आला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही कार रेल्वेच्या ट्रॅकवर मधोमध येऊ थांबली पण त्यातील लोकांना हे कळलं देखील नाही. काही सेकंदाचा वेळ गेल्यानंतर गाडीतील दोन तरुण बाहेर आले. परंतू काही वेळ शिल्लक असताना देखील गाडीचा ड्रायव्हर गाडी पुढेच घेऊन जातच नव्हता. त्यानंतर जशी ट्रेन जवळ येते. तसा या कारचा ड्रायव्हर घाई करतो आणी आपली कार पुढे घेतो. त्याच सेकंदाला ट्रेन येते जी या कारच्या मागून हळूहळू जाते. हे ही पाहा : रस्ता अपघाताचा थरारक Video, डंपर चालकानं गाडीवरील तरुणीला चिरडलं नशीबाने ही घटना टळली, नाहीतर तुम्ही विचार करु शकता की किती मोठा अपघात होऊ शकला असता. हा व्हिडीओ nowthisnews नावाच्या एका विदेशी न्यूज चॅनेलने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. जो पाहून तुमच्या अंगावर काटा उभा राहिल.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की कशी एका ट्रक वाल्यामुळे कार रेल्वे रुळाच्या अगदी मधोमध येऊन थांबली आणि तेवढ्यात समोरुन ट्रेन देखील आली. या व्हिडीओला लोकांनी भरभरुन प्रतिक्रीया दिल्या जात आहेत. काहींनी हा व्हिडीओ चीनमधील असल्याचं म्हटलं आहे. ट्रकचा ब्रेक न लागल्यामुळे ही घटना घडली असल्याचं सांगितलं जात आहे.