जाहिरात
मराठी बातम्या / Viral / ''वो स्त्री है कुछ भी कर सकती है'', बसमध्ये चढणाऱ्या तरुणीचा Video एकदा पाहाच

''वो स्त्री है कुछ भी कर सकती है'', बसमध्ये चढणाऱ्या तरुणीचा Video एकदा पाहाच

''वो स्त्री है कुछ भी कर सकती है''

''वो स्त्री है कुछ भी कर सकती है''

माणासांनी खचाखच भरलेल्या बसमध्ये चढण्यासाठी तरुणीने केलं असं काही, Video पाहून तुम्हाला बसेल धक्का

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई 08 डिसेंबर : सोशल मीडियावर व्हिडीओची कमी नाही. येथे एकदा का तुम्ही आलात की तुम्हाला असंख्य व्हिडीओ पाहायला मिळतील. म्हणूनच तर हे व्हिडीओ पाहाताना तासनतास वेळ कसा निघून जातो, हे लोकांना कळत नाही. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा एक मनोरंजक व्हिडीओ तर आहे. पण तो पाहून तुम्हाला आश्चर्य देखील वाटेल. हा व्हिडीओ एका तरुणीचा आहे. या तरुणीला बसमधून प्रवास करायचा असतो. पण बस संपूर्ण भरल्यामुळे तिला बसमध्ये चढतायेत नव्हतं. त्यामुळे ती बसमध्ये बसण्यासाठी अशी काही ट्रिक वापरते, जी पाहून तुम्हाला हसू येईल. हे ही पाहा : किती तो निरागसपणा! आधी मेणबत्ती फुकता येत नव्हती, मग जेव्हा फुकली तेव्हा… Video Viral हा व्हिडीओ नक्की कुठला आहे? हे कळू शकलेलं नाही. पण बस स्टँडवर बस थांबलेली दिसत आहे. ज्यामध्ये खूपच जास्त गर्दी असलेली पाहायला मिळत आहे. लोक अगदी दरवाजापर्यंत लटकलेले दिसत आहे. त्यामुळे बस इतकी भरली आहे की एक ही व्यक्तीला आत चढायला जागा नाही. पण अशात बसमध्ये चढण्यासाठी तरुणी शक्कल लावते. ती थेट बसच्या खिडकीमधून बसमध्ये चढते. तिची बसमध्ये चढण्याच्या स्टाईलने लोकांना आश्चर्यचकीत केलं आहे.

जाहिरात

ही तरुणी आधी खिडकीच्या रॉडला पकडते आणि मग त्याला लटकून आपले दोन पाय खिडकीच्या आत टाकते. त्यानंतर ती आपलं अंग आत घेते आणि मग डोकं असं करत ती संपूर्ण बसच्या आत शिरते. या तरुणीला बसच्या आतील मंडळी देखील चढण्यासाठी मदत करत आहेत. ही तरुणी जेव्हा बसमध्ये चढत होती. तेव्हा बस सुरु होती. नशीबाने तिला आत जाता शक्य झालं, नाहीतर कदाचित हा प्रयोग तिच्या जीवावर देखील बेतू शकला असता.

News18लोकमत
News18लोकमत

व्हिडीओ पाहूम सोशल मीडियावर लोक कमेंट करु लागले आहे. काही जण मुलींची पावर असं म्हणत आहेत. तर काही लोक ‘वो स्त्री हे कुछ भी कर सकती है’ असा फिल्मी डायलॉग देखील मारत आहे. हा व्हिडीओ खूपच मजेदार आहे. जो नेटकऱ्यांना पोट धरुन हसायला भाग पाडत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात