नवी दिल्ली 03 मार्च : सोशल मीडियावर अनेकदा असे व्हिडिओ पाहायला मिळतात जे अंगावर काटा आणतात. जंगली आणि धोकादायक प्राण्यांच्या जवळ गेल्यास शिक्षा मिळाल्याचं अनेकदा दिसून येतं. अनेकवेळा तुम्ही असे काही व्हिडिओ पाहिले असतील ज्यामध्ये लोक साप आणि अजगर सारख्या धोकादायक प्राण्यांना पाळीव प्राण्यांप्रमाणे हाताळतात. त्यांना स्वतःच्या इतके जवळ ठेवतात, की सामान्य लोक कल्पनाही करू शकत नाहीत. पण प्राण्यांशी असलेली ही जवळीक आणि आत्मविश्वास लोकांना अनेक वेळा महागात पडला आहे. कारण अनेकदा हे प्राणी माणसाचा जीवही घेतात. रात्रीच्या अंधारात बिबट्याची दहशत, रस्त्यावर फिरताना Video व्हायरल नुकताच इन्स्टाग्रामवर o_my_god_1.4.3 नावाच्या अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला गेला आहे. व्हि़डिओमध्ये अजगराने वृद्धाचा गळा अतिशय घट्ट पकडलेला दिसतो. य़ामुळे त्या व्यक्तीला श्वास घेणंही कठीण झालं, काही वेळातच तो जीव वाचवण्याची विनवणी करू लागला. त्यानंतर काही लोक पळत आले आणि अजगराला या व्यक्तीपासून दूर करण्याचा प्रयत्न केला. पण तो अजगर अधिकच घट्ट होत गेला. हृदय पिळवटून टाकणारा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओला 4 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एका वृद्धाच्या गळ्यात अजगर लपेटलेला दिसत आहे. थोड्या वेळाने सगळं नॉर्मल वाटू लागलं, मात्र अचानक वातावरण बदललं. तेव्हा म्हातारा जीव वाचवण्याची विनवणी करू लागला. त्याला त्रास होत असल्याचं पाहून लोक घाबरले. एक मुलगा ताबडतोब त्या वृद्धाकडे पोहोचला आणि त्याच्या गळ्यातील अजगर काढण्याचा प्रयत्न करू लागला. एकापाठोपाठ आणखी काही लोकही त्या माणसाच्या गळ्यातील अजगर सोडवण्याचा प्रयत्न करताना दिसले. पण अजगर सोडायला तयार नव्हता. जसजसे लोकांचे प्रयत्न वाढत गेले तसतसा अजगर अधिकाधिक घट्ट होत गेला. गळा जास्तच आवळला गेल्याने हा व्यक्ती धाडकन जमिनीवर कोसळला. लेकीसोबतची ती भेट ठरली शेवटची; घरी परतताना रस्त्यातच जोडप्याला मृत्यूनं गाठलं, धक्कादायक VIDEO हा व्हिडिओ अंगावर काटा आणणारा आहे. गावकऱ्यांच्या डोळ्यासमोर अजगर या व्यक्तीचा जीव घेत होता आणि लोक काहीच करू शकत नव्हते. अनेक मुलांनी हिंमत दाखवून अजगराला ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रत्येक वेळी अपयश आले. त्यानंतर व्हिडिओमध्ये घाबरण्याचे आणि किंचाळण्याचे आवाज येऊ लागले. व्हिडिओ पाहिल्यानंतर कोणीही घाबरेल. युजर्सनीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. व्हिडिओ बनवण्याऐवजी अजगरात गुंडाळलेल्या व्यक्तीला मदत करायला हवी होती, असे बहुतेकांचे मत होते. व्हिडिओला 4 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.