नवी दिल्ली, 2 मार्च : जंगलातील प्राण्यांचा वावर मानवी वस्तीकडे वाढला आहे. त्यामुळे जंगली प्राणी कुठेही, कोणत्याही वेळी पहायला मिळतात. वन्य प्राणी मानवी वस्तीत आढळल्यावर सर्वत्रच खळबळ पहायला मिळते. प्राण्यांच्या दहशतीचे अनेक फोटो व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशातच यामध्ये आणखी एका व्हिडीओची भर पडली असून भयानक बिबट्याचा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरतोय. आयएफएस अधिकारी साकेत बडोला यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये एक भयानक बिबट्या रस्त्यावर फिरताना दिसत आहे. साकेत बडोलाच्या कॅप्शननुसार, हा व्हिडिओ उत्तराखंडमधील नैनितालचा आहे. व्हिडिओमध्ये दिसणारा बिबट्या ठाकूर देव सिंग बिश्त कॅम्पसमध्ये फिरताना दिसत आहे. ते पाहिल्यापासून परिसरात भीतीचे वातावरण आहे.
Post-dinner walk, in the city of #Nainital. pic.twitter.com/uhuoXwz0UQ
— Saket Badola (@Saket_Badola) February 27, 2023
सध्या जंगलात जनावरांच्या टंचाईमुळे बिबट्या मानवी वस्तीच्या आसपास भक्ष्याच्या शोधात दिसत आहेत. यादरम्यान तो रस्त्यावर फिरणाऱ्या कुत्र्यांसह पाळीव प्राण्यांच्या शिकारीत राहतो. बिबट्याच नाही तर इतर प्राणीदेखील सर्रास फिरताना आढळतात. यामुळे प्राण्यांची दहशत वाढली आहे.
दरम्यान, हा बिबट्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून यावर अनेक प्रतिक्रियादेखील येताना दिसत आहे. यापूर्वीही असे वन्य प्राणी फिरतानाचे अनेक फोटो व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. प्राण्यांते हल्ल्याचेही दृशं्य सीसीटीव्हीमध्ये कैद झालेले दिसून आले.