जाहिरात
मराठी बातम्या / Viral / लेकीसोबतची ती भेट ठरली शेवटची; घरी परतताना रस्त्यातच जोडप्याला मृत्यूनं गाठलं, धक्कादायक VIDEO

लेकीसोबतची ती भेट ठरली शेवटची; घरी परतताना रस्त्यातच जोडप्याला मृत्यूनं गाठलं, धक्कादायक VIDEO

लेकीसोबतची ती भेट ठरली शेवटची; घरी परतताना रस्त्यातच जोडप्याला मृत्यूनं गाठलं, धक्कादायक VIDEO

मुलगा जयसिंगने सांगितले की, वडील मोहनलाल आणि आई धन्वंतरी बहीण सुमनच्या घरी गेले होते. दोघेही परतत असताना हनुमान चौराहा येथे बसमधून खाली उतरले.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

जयपूर 02 मार्च : अलवरमध्ये बुधवारी गाडीच्या प्रचंड वेगाने कहर केला. रस्त्याच्या कडेला चाललेल्या एका वृद्ध जोडप्याला मद्यधुंद कारचालकाने धडक दिली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. वृद्ध दाम्पत्य आपल्या मुलीला भेटून घरी परतत होते. दोघेही बसमधून उतरून पायी घराकडे जात असताना भरधाव वेगात आलेल्या बोलेरोने दोघांना धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की दोघंही हवेत उडून काही फूट दूरवर जाऊन पडले. एकटा व्यक्ती दिसताच लुटण्यासाठी आले चोर; इतक्यात घटनास्थळी पोहोचले पोलीस अन्..Live Video पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात ठार झालेले वृद्ध दाम्पत्य हे खुदानपुरी येथील रहिवासी होते. या अपघातात आणखी एक महिला गंभीर जखमी झाली आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी रुग्णवाहिकेच्या मदतीने मृतांचे मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. मृताचा मुलगा जयसिंगने सांगितले की, वडील मोहनलाल आणि आई धन्वंतरी बहीण सुमनच्या घरी गेले होते. दोघेही परतत असताना हनुमान चौराहा येथे बसमधून खाली उतरले.

जाहिरात

दोघेही रस्त्याच्या कडेला चालत पायी घरी येत होते. त्याचवेळी भरधाव वेगात असलेल्या बोलेरोने दोघांनाही धडक दिली. दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एक महिला गंभीर जखमी झाली. अपघाताची माहिती मिळताच नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. रडून रडून नातेवाईकांची दुरवस्था झाली आहे. या घटनेनंतर आरोपी चालक घटनास्थळीच वाहन सोडून पळून गेला. पोलिसांनी घटनास्थळ गाठून वाहन ताब्यात घेतले. याप्रकरणी नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. कारमध्ये बसलेल्या तरुणांनी दारू प्यायली असल्याचं स्थानिकांनी सांगितले. त्याच वेळी, पीटीआय या वृत्तसंस्थेने आपल्या वृत्तात म्हटलं आहे की, पोलिसांनी नंतर चालक, सेवानिवृत्त सहायक पोलीस उपनिरीक्षक कैलाश मीणा यांना ताब्यात घेतलं. पोलिसांनी सांगितलं की, प्राथमिक तपासात चालक दारूच्या नशेत होता, असं समोर आलं आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. कुटुंबीयांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी एफआयआर नोंदवून अन्य आरोपींचा शोध सुरू केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात