जाहिरात
मराठी बातम्या / Viral / अजगराने तोंड उघडताच हरणाला गिळलं, संपूर्ण Video पाहून बसेल धक्का

अजगराने तोंड उघडताच हरणाला गिळलं, संपूर्ण Video पाहून बसेल धक्का

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ

अजगराला अधिक धोकादायक शिकारी म्हटले तर ते चुकीचे नाही आणि या व्हिडीओमध्ये अजगराने देखील हेच केलं.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई 29 डिसेंबर : वाघ, सिंह, मगर आणि साप हे असे जीव आहेत, ज्यांच्यापासून सगळेच प्राणी लांब राहातात. प्राणीच काय तर हे जीव माणसांसाठी देखील धोकादायक आहेत. त्यांच्या तावडीत एकदा का कोणी आला तर विषयच संपला. ते कधीच आपल्या शिकाराला जीव वाचवण्याची दुसरी संधी देत नाहीत. यांच्यासंबंधीतचे अनेक व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असेल. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जो पाहून तुम्हाल भीती वाटेल. हे ही पाहा : Viral Video: याला म्हणतात कर्माचं फळ, तरुणाने म्हशीला लाथ मारली आणि… हा व्हायरल व्हिडीओ अजगराशी संबंधीत आहे. अजगराला अधिक धोकादायक शिकारी म्हटले तर ते चुकीचे नाही. हा महाकाय सरपटणारा प्राणी आपली शिकार जिवंत गिळतो, तो आधी आपल्या शिकाराला घट्ट विळखा घालतो, ज्यामुळे शिकाराला हलता देखील येत नाही, ज्यानंतर तो आपलं मोठं तोंड खोलून शिकाराला गिळतो. या व्हायरल व्हिडीओमध्ये अजगराने एका हरणाला जिवंत गिळले आहे. ते ही अनेक लोकांच्यासमोर, या घटनेचा व्हिडीओ तेथील लोकांनी शुट केला आणि सोशल मीडियावर शेअर केला आहे.

जाहिरात

या व्हिडीओमध्ये तुम्ही अगदी जवळून पाहू शकता की कसे अजगराने हळूहळू करुन हरणाला आपल्या पोटात ढकलले. हा काही सेकंदाचा व्हिडीओ अंगावर काटा आणणारा आहे. हे ही पाहा : Video : जेव्हा मगरीचं कॉस्ट्यूम घालून तो खऱ्या मगरीजवळ येतो, पुढे काय घडलं तुम्हीच पाहा हा व्हिडीओ कधी आणि कुठचा आहे हे कळू शकलेले नाही. परंतु वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तो आपलोड करण्यात आला आहे. इंस्टाग्रामवर सुंदर_नवीन_पिक्स नावाच्या पेजवर व्हिडीओही अपलोड करण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात