जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Video : जेव्हा मगरीचं कॉस्ट्यूम घालून तो खऱ्या मगरीजवळ येतो, पुढे काय घडलं तुम्हीच पाहा

Video : जेव्हा मगरीचं कॉस्ट्यूम घालून तो खऱ्या मगरीजवळ येतो, पुढे काय घडलं तुम्हीच पाहा

Viral Video

Viral Video

अलीकडेच, इंटरनेटवर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये नकली मगरीचा पोशाख घातलेला एक माणूस खऱ्या मगरीजवळ गेला आणि नंतर त्याची छेड काढू लागला

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई 08 डिसेंबर : सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही तरुण मंडळी इतकं टोकाचं पाऊल उचलतात की ते आपल्या जीवाची देखील पर्वा करत नाही. सोशल मीडियासाठीच नाही पण असे अनेक तरुण मंडळी आहेत, जे आपलं साहस सिद्ध करण्यासाठी वेगवेगळे स्टंट करत असतात. अलीकडेच, इंटरनेटवर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये नकली मगरीचा पोशाख घातलेला एक माणूस खऱ्या मगरीजवळ गेला आणि नंतर त्याची छेड काढू लागला. त्यानंतर काय घडलं तुम्हीच पाहा…

या व्हिडीओमध्ये या व्यक्तीला काहीही झालेलं नाही, या उलट मगरच त्याला घाबरुन पळून गेली. पण यासाठी या व्यक्तीचं नशीब चांगलं आहे, असंच म्हणावं लागेल. कारण जर मगरीने त्याच्यावर हल्ला केला असता तर ते त्याच्या जीवावर देखील बेतलं असतं. हे ही पाहा : मृत शरिराचं पोस्टमॉर्टम करताना, पोटातून बाहेर आला जिवंत साप आणि… हा व्हिडीओ एका युट्यूब अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. ज्याला भरभरुन लाईक आणि शेअर मिळाले आहेत. हा व्हिडीओ पाहून तो परदेशातील असल्याचे दिसत आहे.

News18लोकमत
News18लोकमत

नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर आपलं वक्तव्य देखील केलं आहे. काही लोकांनी या व्यक्तीच्या धाडसाचं कौतुक केलं आहे, तर काहींनी याला मुर्खपणाचं असल्याचं म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात