कॅनबेरा, 03 डिसेंबर : तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत कुठेतरी बाहेर फिरायला गेलात. गाडी एका ठिकाणी पार्क केली आणि थोड्या वेळाने पुन्हा त्या गाडीत बसायला आलात. तुमच्या गाडीत तुम्हाला अचानक भलामोठा साप (Snake) दिसला (Snake in car). तर तुमची काय अवस्था होईल. अशीच अवस्था झाली ती ऑस्ट्रेलियातील (Australia) एका कुटुंबाची.
ऑस्ट्रेलियात पिकनिकला गेलेल्या एका कुटुंबाच्या कारमध्ये चक्क अवाढव्य अजगर (Python in car) होता. हे कुटुंब जेव्हा गाडीत पुन्हा आलं तेव्हा सर्वांना धक्काच बसला. गाडीत बसलेल्या या सापाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. कारमधील आरशाला हा साप विळखा घालून बसला होता. ऑस्ट्रेलियात साप पकडणाऱ्या जोश कॅसलच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो पोस्ट करण्यात आला आहे.
View this post on Instagram
पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार जेव्हा तुम्ही तुमच्या कारमध्ये पुन्हा येता आणि काचेच्या चारही बाजूने विळखा घातलेला अजगर दिसेल, असं फक्त ऑस्ट्रेलियात होतं. पिकनिकला गेलेल्या एका कुटुंंबाने कार थंड ठेवण्यासाठी कारची खिडकी थोडी उघडी ठेवली. जेव्हा ते गाडीत परत आले तेव्हा त्यांना धक्कादच बसला. या सापाला गाडीतून बाहेर काढण्यात आलं.
हे वाचा - Shocking video : महाकाय अजगराच्या तोंडात डोकं; जीव वाचवण्यासाठी तरुणाची धडपड
हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. असा साप मला दिसला तर मी गाडीत जाणारच नाही, फोटो काढणाऱ्या व्यक्तीच्या हिमतीला दाद द्यायला हवी, अशा कमेंट या पोस्टवर येत आहेत.
गाडीत साप असण्याची ही पहिलीच घटना नाही. याआधीसुद्धा अशी बरीच प्रकरणं समोर आली आहेत. कधी ब्रेक, कधी डिक्की, कधी ग्लोव्ह बॉक्स, कधी बोनेट, तर कधी चाक अशा गाडीच्या बऱ्याच भागात साप दिसून आला आहे.
हे वाचा - VIDEO - तरुणाला पळवून पळवून कोब्राने केला हल्ला; कॅमेऱ्यात कैद झालं खतरनाक दृश्य
ऑस्ट्रेलियात तर अशा घटना घडत असतातच. पण काही महिन्यांपूर्वी भारतातही अशी घटना घडली होती. एका धावत्या कारच्या बोनेटवर साप अवतरला होता. ही थरकाप उडवणारी घटना मध्यप्रदेशहून नाशिककडे येणाऱ्या महामार्गावर घडली. 11 जुलै रोजी मध्य प्रदेशमधील अंजड येथील छोटू सिंग राजपूत यांना भेटून रत्नदिप सिसोदिया आपल्या कुटुंबीयांसह परत येत असताना त्यांच्या शेतातील घराजवळ कसे साप येतात अशा गप्पा गाडीत सुरू असताना भाचा रितेशला गाडीच्या बोनेटवर एक साप आढळून आला आणि दोन तास त्यांना तसाच प्रवास करावा लागला.
.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Australia, Car, Python, Python snake, Viral, Viral videos, Wild animal