मुंबई, 02 डिसेंबर : महाकाय अशा अजगरांना (Python video) प्राण्यांची शिकार करताना तुम्ही पाहिलं आहे. मोठमोठे प्राणी गिळणाऱ्या अशा अजगरांचे (Python attack video) व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होत असतात. पण सध्या जो व्हिडीओ व्हायरल होतो आहे, तो अजगराच्या जबड्यात असलेल्या (Man head in python mouth) कोणत्या प्राण्याचा (Animal video) नाही तर माणसाचा आहे. हा व्हिडीओ पाहूनच धडकी भरते (Shocking video).
सापांसंबंधित बऱ्याच फिल्ममध्ये मोठमोठे अजगर माणसांना गिळताना आपण पाहिले आहेत. पण एरवी फिल्ममध्ये पाहत आलेलो असं दृश्य प्रत्यक्षातही दिसून आलं आहे. एका अवाढव्य अजगराने एका तरुणाचं डोकं आपल्या जबड्यात घेतलं आहे. अजगराच्या तावडीतून सुटण्यासाठी, जीव वाचवण्यासाठी तरुणाचीही धडपड सुरू असताना दिसते आहे.
View this post on Instagram
व्हिडीओत पाहू शकता भल्यामोठ्या अजगराने गाडीला विळखा घातला आहे आणि त्याच्या तोंडात एका तरुणाचं डोकं आहे. तरुण आपली सुटका करण्यासाठी धडपड करतो आहे. पण अजगराच्या जबड्यातून त्याचं सुटणं जवळपास अशक्यच.
हे वाचा - बापरे! छप्पर तोडून बाहेर पडला घरात दडून बसलेला अजगर आणि...; धडकी भरवणारा VIDEO
हा तरुण जीवाच्या आकांताने ओरडतो आहे. त्याचवेळी दुसरी व्यक्ती त्याचा व्हिडीओ बनवताना दिसते आहे. त्या व्यक्तीकडे हा तरुण मदत मागतानाही दिसतो. पण ती व्यक्ती नंतर त्याच्यापासून दूर जाते. आता हा धक्कादायक व्हिडीओ नेमका कुठला आहे, ही घटना कुठे घडली आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला लागली असेल. तर इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. एका प्राणीसंग्रहालयातील हा व्हिडीओ आहे.
पण हा व्हिडीओ जसा दिसतो आहे, तसा खरा नाही. पोस्टच्या कॅप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ म्हणजे झूमधील एक आर्ट आहे. जिथं असा फेक अजगर आहे. ज्याने या तरुणाला धरून ठेवलं आहे आणि तरुण आपल्याला खऱ्याखुऱ्या अजगराने पकडल्याची अॅक्टिंग करतो आहे. हा व्हिडीओ मजेसाठी बनवण्यात आल्याचंही या पोस्टमध्ये स्पष्ट केलं आहे.
हे वाचा - VIDEO - तरुणाला पळवून पळवून कोब्राने केला हल्ला; कॅमेऱ्यात कैद झालं खतरनाक दृश्य
व्हिडीओ पाहून नेटिझन्स हैराण झाले आहेत. कारण तुमच्याप्रमाणेच बहुतेकांना हा खराखुरा अजगरच वाटला. काही युझर्सनी आपल्या अंगावर काटाच आल्याचं म्हटलं. तसंच या तरुणाबाबत चिंताही व्यक्त केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Python, Python snake, Snake, Snake video, Viral, Viral videos, Wild animal