मराठी बातम्या /बातम्या /Viral /VIDEO - तरुणाला पळवून पळवून कोब्राने केला हल्ला; कॅमेऱ्यात कैद झालं खतरनाक दृश्य

VIDEO - तरुणाला पळवून पळवून कोब्राने केला हल्ला; कॅमेऱ्यात कैद झालं खतरनाक दृश्य

कोब्राची शेपटी खेचताच तो संतप्त झाला आणि त्याने त्या व्यक्तीवर हल्लाच चढवला.

कोब्राची शेपटी खेचताच तो संतप्त झाला आणि त्याने त्या व्यक्तीवर हल्लाच चढवला.

कोब्राची शेपटी खेचताच तो संतप्त झाला आणि त्याने त्या व्यक्तीवर हल्लाच चढवला.

मुंबई, 01 डिसेंबर :  समोर साधा गांडुळ दिसला तरी काही जणांना भीती वाटते, अशाच साप दिसला तर अर्धा जीव गेल्यातच जमा. पण काही लोक सापाला (Snake video) पकडण्यात तरबेज असतात. सापांना पकडण्याचं त्यांनी विशेष प्रशिक्षण घेतलेलं असतं. इतर लोकांचा जीव वाचावा यासाठी आपला जीव धोक्यात घालून या व्यक्ती साप पकडतात. अशाच साप पकडणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

एक व्यक्ती कोब्राला पकडताना दिसली. कोब्रा हा सर्वात विषारी साप समजला जातो. ज्याने दंश करताच लगेच त्या व्यक्तीचा मृत्यू होतो. या अशा भयंकर सापाला पकडायला गेलेल्या व्यक्तीवरही त्याने हल्ला केला. संतप्त झालेल्या कोब्राने या व्यक्तीला अक्षरशः पळवून पळवून त्याच्यावर अटॅक केला आहे.

एका घराच्या लॉनमध्ये कोब्रा फिरताना दिसला. त्यानंतर तात्काळ बचाव पथकाला बोलावण्यात आलं. बचाव पथक तिथं दाखल झालं आणि कोब्राला पकडण्याचे प्रयत्न सुरू झाले.

हे वाचा - बापरे! छप्पर तोडून बाहेर पडला घरात दडून बसलेला अजगर आणि...; धडकी भरवणारा VIDEO

ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. @Animal_WorId ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओत पाहू शकता सुरुवातीला दोन व्यक्ती दिसत आहे. पुढे असलेली व्यक्ती हळूहळू सापाजवळ जाते आणि आपली दिशा बदलते. त्याचवेळी मागील व्यक्ती सापाची शेपटी धरताना दिसते. शेपटीला धरताच साप पिसाळतो, संतप्त होत तो शेजारी असलेल्या व्यक्तीवर हल्ला चढवते. त्यावेळी मागे असलेली व्यक्ती मागे जाते.

हे वाचा - Shocking video! छोटासा साप समजून शेपटी खेचली आणि समोर आला...; पाहून तरुणाला फुटला घाम

सापाने पहिल्यांदा हल्ला करता ती व्यक्तीसुद्धा थोडी घाबरते आणि थोडी मागे होते. पण तरी ती सापाला पुन्हा पकडण्याचा प्रयत्न करते. जशी ही व्यक्ती सापाला पकडायला जाते तसा तो साप त्याला दंश करायला बघतो. बऱ्याच अंतरापर्यंत साप त्या व्यक्तीला पळवतो आणि हल्ला करताना दिसतो. अखेर कसंबसं ती व्यक्ती त्या सापाला आपल्या नियंत्रणात करते आणि त्याला पकडते. त्यानंतर एका बॅगेत भरून त्याला जंगलात सोडण्यात आल्याची माहिती मिळते आहे.

First published:

Tags: King cobra, Poisonous cobra, Snake, Snake video, Viral, Viral videos