मराठी बातम्या /बातम्या /Viral /

सुपरमार्केटमध्ये दबा धरून बसला होता भलामोठा अजगर; महिलेने डबा हटवताच...; पाहा VIDEO

सुपरमार्केटमध्ये दबा धरून बसला होता भलामोठा अजगर; महिलेने डबा हटवताच...; पाहा VIDEO

सुपरमार्केटमध्ये अजगर

सुपरमार्केटमध्ये अजगर

सुपरमार्केटमधील मसाल्यांच्या डब्यामागे हा अजगर लपून बसला होता.

  • Published by:  Priya Lad

सिडनी, 18 ऑगस्ट : जंगल, नॅशनल पार्कमध्ये गेल्यावर एखादा साप दिसणं ठिक आहे. पण अजगर (Python) तोपण सुपरमार्केटमध्ये (Python in Supermarket) स्वप्नातही असं काही आपल्याला दिसणार नाही. पण प्रत्यक्षात ते घडलं आहे. एका सुपरमार्केटमध्ये चक्क भलामोठा अजगर (Python video)  सापडला आहे. सुपरमार्केटमध्ये सामान ठेवलेल्या शेल्फवर हा अजगर लपून बसला होता.

ऑस्ट्रेलियाच्या (Ausralia) सि़डनीतील (Sydney)  ही घटना आहे. वुलवर्थ्स सुपरमार्केटमध्ये  (Woolworths Supermarket) एक महिला सामान खरेदी करण्यासाठी गेली. ती मसाले घेत होती. तिथं मसाल्यांच्या डब्यामागे तिला दोन डोळे चमकताना दिसले. त्यानंतर पुढे जे दिसलं ते पाहून तिला धक्काच बसला.

ते डोळे चक्क अजगराचे होते. भलामोठा अजगर सुपरमार्केटमध्ये डब्यांमागे लपून बसला होता (Hidden Python in spice stock). महिला घाबरली पण परिस्थितीचं भान राखत ती मोठ्याने ओरडली नाही.

हे वाचा - Pet dog सोबत फोटो चांगलाच महागात; कुत्र्याने जबड्यात धरला तरुणीचा चेहरा आणि...

हेलाइना अल्टी (Helaina Alati ) असं या महिलेचं नाव आहे.  तिने सांगितल्यानुसार, ती  मसाले घेत होती. तेव्हा तिला डब्यामागे डोळे दिसले. अजगर तिच्यापासून 20 सेंटिमीटर दूर होता. हेलाइना स्वतः साप पकडण्यात तज्ज्ञ होती. त्यामुळे तिने आधी सुपरमार्केटमधील कर्मचाऱ्यांना तिथं अजगर असल्याची माहिती दिली त्यानंतर तिनं आपल्या घरी जाऊन काही आवश्यक सामान आणून सापाला पकडण्यात मदत केली. का फेसबुक युझरने सुपरमार्केटमधील अजगराचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

हे वाचा - VIDEO- यांच्यापेक्षा जनावरं बरी! प्राणीसंग्रहालयात एकमेकांच्या जीवावर उठली माणसं

अजगर शांत होता आणि तो सहजपणे बॅगेत गेला, असं तिनं सांगितलं. अनेक विचित्र ठिकाणी तिने सापांना पकडलं आहे, पण सुपरमार्केटमध्येही साप असू शकतो, याची आपण कल्पना केली नव्हती, असं हेलाइनाने सांगितलं.

माहितीनुसार हा अजगर विषारी नव्हता पण तो चावल्यास प्रचंड वेदना झाल्या असत्या. इतर सापांप्रमाणे त्यांच्यात विष नसतं. पण त्यांचे दात खूप लागतात.

First published:

Tags: Australia, Python, Python snake, Viral, Viral videos