मराठी बातम्या /बातम्या /Viral /

Pet dog सोबत फोटो पडला चांगलाच महागात; कुत्र्याने जबड्यात धरला तरुणीचा चेहरा आणि...

Pet dog सोबत फोटो पडला चांगलाच महागात; कुत्र्याने जबड्यात धरला तरुणीचा चेहरा आणि...

कुत्र्याने तरुणीच्या चेहऱ्याची भयंकर अवस्था केली आहे.

कुत्र्याने तरुणीच्या चेहऱ्याची भयंकर अवस्था केली आहे.

कुत्र्याने तरुणीच्या चेहऱ्याची भयंकर अवस्था केली आहे.

  • Published by:  Priya Lad
ब्यूनस आयर्स, 18 ऑगस्ट : प्राणी माणसांमध्ये (Human and animal) राहू लागले तरी ते कधी काय करतील याचा नेम नाही. त्यामुळे जरी तुम्ही कुत्रा (Dog), मांजर असे प्राणी पाळले तरी त्यांच्यापासून सावध राहायला हवं. कारण ते कधीही हल्ला करू शकतात (Dog attack). सध्या अशीच एक घटना समोर आली आहे. ज्यात कुत्र्यासोबत सेल्फी घेणाऱ्या तरुणीवर कुत्र्याने हल्ला केला आहे (Dog Attacks Girl). आपल्या पाळीव कुत्र्यासोबत फोटो काढणं तरुणीला चांगलंच महागात पडलं. फोटो काढता काढता कुत्रा चवताळला आणि त्याने तरुणीवर हल्लाच केला. सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल होत आहेत. अर्जेंटिनात राहणारी 17 वर्षांची लारा संसो आपल्या जर्मन शेफर्डसोबत फोटो काढत होती. त्याच्या गळ्यात हात टाकून वेगवेगळ्या पोझ देत तिचं फोटोसेशन सुरू होतं. सुरुवातीला कुत्रा खूपच शांत दिसतो आहे. पण काही क्षणातच तो चवताळतो आणि लारावर हल्ला करतो. लाराचा चेहराच आपल्या जबड्यात घेतो. हे वाचा - ...आणि मगरीने तिला जबड्यात धरून पाण्यातच खेचलं; VIDEO पाहून अंंगावर येईल काटा कुत्र्याने लाराचा चेहरा आपल्या दातात धरून ठेवला. तिला प्रचंड वेदना होत होत्या. ती मोठमोठ्याने ओरडू लागली. तिचा आवाज ऐकून तिथं असलेले तिचे मित्रमैत्रिणी तिच्याकडे धावत आले. त्यांनी कसंबसं लाराला कुत्र्याच्या तावडीतून सोडवलं. कुत्र्याच्या हल्ल्यात लारा गंभीर जखमी झाली. तिच्या चेहऱ्याच्या एका बाजूवर गंभीर जखमा झाल्या. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. हे वाचा - OMG! कुत्र्यासाठी थेट भुकेल्या अ‍ॅनाकोंडाशी भिडला तरुण; थरारक VIDEO VIRAL तिच्या चेहऱ्यावर कुत्र्याने इतका चावा घेतला होता की तिला टाके घालावे लागले. ज्यामुळे तिच्या चेहऱ्याची अवस्था भयंकर झाली आहे.
First published:

Tags: Dog, Viral

पुढील बातम्या