बीजिंग, 18 ऑगस्ट : माणूस (Human) आणि प्राण्यांमध्ये (Animal) बराच फरक असतो. पण कधी कधी माणसं असं वागतात की प्राण्यांमध्ये आणि त्यांच्यात काहीच अंतर राहत नाही. किंबहुना माणसांपेक्षा प्राणीच बरे असं वाटतं. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात माणसं अक्षरश: जनावरांसारखी भिडली. प्राणीसंग्रहायलात माणसं एकमेकांच्या जीवावर उठली (Fight In Zoo). चीनच्या (China) बीजिंगमधील (Beijing) प्राणीसंग्रहालयातील (Zoo) भयंकर हाणामारी झाली आहे. माणसं आपसातच भिडली आहे. बीजिंग वाइल्डलाइफ पार्कमध्ये (Beijing Wildlife Park) ही धक्कादायक घटना घडली आहे. माणसं आपसात जनावरांसारखी भांडताना दिसली.
A big fight that occurred at the Beijing Wildlife Park yesterday apparently set a very bad example for the animals witnessing it. According to the park, the animals imitated these wild humans and had their own altercation at night. (Video via Beijing Life/北京生活) pic.twitter.com/ldgn63ya6g
— Manya Koetse (@manyapan) August 8, 2021
Manya Koetse ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. 7 ऑगस्टला प्राणीसंग्रहायलाच आलेल्या पर्यटकांमध्ये लढाई झाली. सुरुवातीला दोन महिलांनी एकमेकींवर हल्ला केला. त्यानंतर संपूर्ण कुटुंबच एकमेकांवर तुटून पडलं. महिलांनी एकमेकांच्या झिंझ्या उपटल्या. एकमेकींना लाथा मारल्या. हे वाचा - …अन् जीव वाचवण्यासाठी बिबट्याची धडपड; कधीच पाहिला नसेल असा VIDEO फक्त महिलाच नाही तर चक्क पुरुषही महिलांना लाथा मारताना दिसले. व्हिडीओ पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. याबाबत पार्क प्रशासनाने चीनच्या सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार, पार्कमध्ये फिरायला आलेल्या पर्यटकांमध्ये अचानक कोणत्या तरी कारणावरून हाणामारी झाली. संपूर्ण घटना तिथल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. माणसांना असं एकमेकांना मारताना पाहून तिथले प्राणीही आपसात असे लढू लागले. हे वाचा - …आणि मगरीने तिला जबड्यात धरून पाण्यातच खेचलं; VIDEO पाहून अंंगावर येईल काटा या हाणामारीत काही जणांना दुखापतही झाली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.