मराठी बातम्या /बातम्या /Viral /

...अन् 20 फूट अजगरानं तीन वेळा केला हल्ला; हादरवून टाकणारा Video आला समोर

...अन् 20 फूट अजगरानं तीन वेळा केला हल्ला; हादरवून टाकणारा Video आला समोर

सध्या एक अतिशय धक्कादायक व्हिडिओ (Shocking Video) समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये भलामोठा अजगर एका व्यक्तीवर हल्ला (Python Attack) करताना दिसत आहे.

सध्या एक अतिशय धक्कादायक व्हिडिओ (Shocking Video) समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये भलामोठा अजगर एका व्यक्तीवर हल्ला (Python Attack) करताना दिसत आहे.

सध्या एक अतिशय धक्कादायक व्हिडिओ (Shocking Video) समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये भलामोठा अजगर एका व्यक्तीवर हल्ला (Python Attack) करताना दिसत आहे.

  नवी दिल्ली 06 सप्टेंबर : सोशल मीडियावर (Social Media) प्राण्यांचे अनेक व्हिडिओ सतत व्हायरल (Viral Videos of Animals) होत असतात. बहुतेकदा हे व्हिडिओ अतिशय क्यूट असतात आणि सोशल मीडिया यूजर्सच्या पसंतीस उतरतात. हे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअरही केले जातात. कुत्रा आणि मांजर यांच्याशिवाय इतरही अनेक प्राण्यांच्या व्हिडिओला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसंती मिळते. मात्र, सध्या एक अतिशय धक्कादायक व्हिडिओ (Shocking Video) समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल. या व्हिडिओमध्ये भलामोठा अजगर एका व्यक्तीवर हल्ला (Python Attack) करताना दिसत आहे. घरी येताच पत्नीने दिली Good News! प्रेग्नेन्सी टेस्ट पाहताच नवरा हादरलाच! जे ब्रियुअर कॅलिफोर्नियामध्ये एक रेप्टाइल झू चालवतात. याठिकाणी अनेक वेगवेगळे प्राणी आहेत. जे हे सोशल मीडियावर भरपूर प्रसिद्ध आहेत. इन्स्टाग्रामवर त्यांना 4 मिलियनहून अधिक लोक फॉलो करतात. जे ब्रियुअर नेहमीच प्राण्यांचे व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर करत असतात. या व्हिडिओजमध्ये ते प्राण्यांसोबत वेळ घालवताना आणि मस्ती करताना दिसतात. नुकताच जे यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक 20 फूट लांब अजगर जे ब्रियुअर यांच्यावर हल्ला करताना दिसतो. एकदाच नाही तर अनेकदा हा अजगर त्यांच्यावर हल्ला करतो. मात्र, तरीही त्यांच्या चेहऱ्यावर जराही भीती दिसत नाही. हा व्हिडिओ आतापर्यंत सुमारे 8 लाख जणांनी पाहिला आहे. जेच्या आसपास असणारे इतर लोकही व्हिडिओ शूट करताना दिसत आहेत.
  बापरे! 200 किलोचा वळू चढला दोन मजली घरावर, पाहा सुटकेचा थरारक VIDEO जे यांनी इन्स्टाग्रामवर सांगितलं, की अजगरानं त्यांच्यावर हल्ला का केला. जे अजगराची अंडी उचलून सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न करत होते. जेणेकरून त्यांना काही नुकसान पोहोचू नये. मात्र, हे करत असतानाच अजगरानं त्यांच्यावर हल्ला केला. व्हिडिओमध्ये एक - दोन वेळा ते अजगरापासून वाचल्याचं दिसलं मात्र अखेर अजगरानं त्यांच्यावर हल्ला केलाच. मात्र, अजगर विषारी नसतो, तो आपल्या शरीरानं घट्ट पकडून शिकार करतो. त्यामुळे अजगरानं चावा केल्यानं जे यांच्यावर काहीही परिणाम झाला नाही. व्हिडिओ शेअर करत त्यांनी सांगितलं, की ही मादा अजगर सूपर मॉम आहे, जी आपल्या अंड्यांचं रक्षण करत आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Python snake, Shocking video viral

  पुढील बातम्या