मराठी बातम्या /बातम्या /Viral /

बापरे! 200 किलोचा वळू चढला दोन मजली घरावर, पाहा सुटकेचा थरारक VIDEO

बापरे! 200 किलोचा वळू चढला दोन मजली घरावर, पाहा सुटकेचा थरारक VIDEO

दोन मजली इमारतीवर (2 floor building) चढलेला तब्बल 200 किलोचा वळू (Bull) खाली उतरवतानाचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल (Viral Video) होत आहे.

  • Published by:  desk news

मुंबई, 5 सप्टेंबर : इंटरनेटवर (Internet) सध्या अनेक व्हिडिओ (Video) व्हायरल होत असतात. आपल्या आजूबाजूला एखादी विचित्र घटना घडत असलेलं पाहिलं, की लोक लगेच मोबाईल काढून त्या घटनेचं चित्रिकरण करतात आणि सोशल मीडियावर अपलोड करतात. त्यातील काही घटना गंभीर असतात, तर काही मजेशीर. दोन मजली इमारतीवर (2 floor building) चढलेला तब्बल 200 किलोचा वळू (Bull) खाली उतरवतानाचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल (Viral Video) होत आहे. " isDesktop="true" id="601022" >

इमारतीवर असा चढला वळू

सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे पावसापासून वाचण्यासाठी प्राणी वेगवेगळ्या ठिकाणी आसरा शोधताना दिसतात. अचानक आलेल्या पावसामुळे एक वळू आसरा शोधण्यासाठी एका इमारतीपाशी आला. या इमारतीच्या जिन्याचं गेट उघडं असल्यामुळे त्यातून तो आत शिरला. जिना चढत चढत हा वळू इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील गॅलरीत पोहोचला.

वळू जिना चढत असताना कुणाचंच लक्ष गेलं नाही. मात्र वळू इमारतीवर असल्याचं पाहून सर्वांची भितीने गाळण उडाली. सर्वात मोठा प्रश्न हा होता की या वळूला खाली कसं उतरवायचं. काही नागरिकांनी फोनवरून या घटनेची कल्पना स्थानिक पोलिसांना दिली.

स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा अंदाज घेतला. या वळूला खाली उतरवण्यासाठी क्रेन मागवण्यात आली. क्रेनच्या मदतीनं परिश्रम करून या वळूला अखेर खाली उतरवण्यात यश आलं. या सगळ्यात पोलिसांची आणि नागरिकांची चांगलीच दमछाक झाली. तिथं उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड करून तो सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

First published:

Tags: Video viral, Viral video.