Home /News /viral /

घरी येताच पत्नीने दिली Good News! प्रेग्नेन्सी टेस्ट पाहताच नवऱ्याच्या पायाखालची जमीन सरकली

घरी येताच पत्नीने दिली Good News! प्रेग्नेन्सी टेस्ट पाहताच नवऱ्याच्या पायाखालची जमीन सरकली

कोणत्याही दाम्पत्यासाठी (Couple) आई-बाबा होण्याचा (Parents) अनुभव खूप खास असतो. मात्र इथं वेगळीच परिस्थिती आहे.

    कोणत्याही दाम्पत्यासाठी (Couple) आई-बाबा होण्याचा (Parents) अनुभव खूप खास असतो. जेव्हा एक बाई आपल्या बाळाला जन्म (Child Birth) देते आणि कोणी पुरुष जेव्हा पहिल्यांदा आपल्या बाळाला कडेवर उचलून घेतो, ते क्षण दोघांसाठी अद्भूत असतात. अनेकदा पत्नी (Wife) आपल्या पतीला (Husband) प्रेग्नेन्सीचं (Pregnancy) वृत्त सरप्राइज देऊन (Surprise) सांगते. अचानक हे वृत्त ऐकल्यानंतर कोणत्याही पुरुषाला आनंदाचा धक्काच मिळेल. मात्र या केसमध्ये जेव्हा पत्नीने पतीला ती गर्भवती असल्याचं सांगितलं तर त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. सोशल मीडिया साइट रेडिटवर नुकतच एका व्यक्तीने आपल्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. या व्यक्तीने सांगितलं की, तो दोन मुलांचा बाबा आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या पत्नीने सरप्राइज देत तिला सांगितलं की, ती प्रेग्नेंट (Pregnant) आहे. आणि दोघे पुन्हा आई-बाबा होणार आहेत. हे ऐकताच व्यक्तीच्या पायाखालची जमीन सरकली. कारण दोन वर्षांपूर्वी त्याने (Vasectomy) नसबंदी केली होती. त्याने या साइटवर आपली चिंता व्यक्त केली आहे. त्याने त्यावर लिहिलं आहे की, मी दोन वर्षांपूर्वी नसबंदी केली होती. ते बाळ माझंच असेल याची किती शक्यता आहे. किंवा मग माझ्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध (Extra marital Affair) असतील. इतकी वर्षे पत्नीसोबत राहत आहे, मला वाटत नाही की ती मला धोका देईल.  नसबंदी केल्यानंतरही प्रेग्नेंन्सीची किती शक्यता असते, याबद्दल ही व्यक्ती लोकांकडून मदत मागत आहे. (The wife gave the husband the good news husband, who had undergone sterilization 2 years ago shocked) हे ही वाचा-पुण्यातील तरुणीला आईच्या रिलेशनशीपचा लागला सुगावा;BFच्या मदतीनं उकळले लाखो रुपये या व्यक्तीला विविध प्रकारच्या प्रतिक्रिया मिळत आहे. काहींनी सांगितलं की, त्याने पत्नीवर संशय घेऊ नये. तर काहींनी त्याला स्पर्म काऊंट चेक करण्याचा सल्ला दिला आहे. एका डॉक्टरने लिहिलं आहे की, त्यांच्या एका रुग्णासोबतही असं झालं होतं. त्याची पत्नी नसबंदी केल्यानंतर गर्भवती झाली होती. तर काही जणांनी व्यक्तीला नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. बाळाचं डीएनए टेस्ट करण्याचा सल्ला दिला आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Pregnancy, Pregnant woman

    पुढील बातम्या