नवी दिल्ली, 22 मे : अजगर आणि मगर हे दोन्हीही सरपटणारे प्राणी एखाद्या प्राण्याची जिवंतच शिकार करतात. अजगर, मगरीने एखादा प्राणी अख्खाच गिळल्याचे अनेक व्हिडीओ पाहिलेही असतील. पण या दोघांनी मगर (Crocodile) आणि अजगराने (python) एकमेकांना गिळण्याचा प्रयत्न केल्याचा व्हिडीओ कदाचित पाहिला नसेल. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात एक मगर आणि अजगर आमने-सामने येतात. आणि एकमेकांना गिळण्याचा प्रयत्न करू लागतात.
या व्हिडीओमध्ये एक भलामोठा अजगर, मोठ्या मगरीला गिळत असल्याचं दिसतं आहे. हा अजगर मोठा, लांब आणि तितकाच अतिशय शक्तिशालीही आहे. मगरही कमी शक्तिशाली नाही. पण बराच वेळ झालेल्या संघर्षानंतर अजगर मगरीला पूर्णपणे आपल्या विळख्यात घेण्यात यशस्वी होतो. आणि हळू-हळू करत तिला संपूर्ण गिळतो. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल.
अनेकदा अजगर झाडांवर राहतात. पाण्यात, चिखलात किंवा सुकलेल्या पानांमध्ये लपून आपल्या शिकारीची वाट पाहतात. शिकार जवळ येताच त्यावर तुटून पडतात.
हा व्हिडीओ ओजाट्रो नावाच्या एका यूट्यूब चॅनलवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आजवर 14 कोटी 84 लाखहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crocodile, Python, Python snake, Video viral