नवी दिल्ली, 23 एप्रिल : बिबट्या सर्वात ताकदवान आणि हुशार शिकारी आहे. आपल्या शिकारीच्या पद्धतीसाठीही बिबट्या प्रसिद्ध आहे. बिबट्याची एखादीच शिकार सुटू शकते, असाच एक शिकारीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. बिबट्याने हरणाची शिकार केल्यानंतर, एक तरस हरणाला वाचवण्यासाठी आलं. हा व्हिडीओ क्रुगर सायटिंग्स नावाच्या यूट्यूब चॅनेलवर शेअर करण्यात आला आहे.
या व्हिडीओमध्ये एका जंगलात काही हरणांची झुंड नदी किनारी पाणी पिताना दिसतेय. या हरणांच्या कळपाला कोणी त्यांच्यावर हल्ला करेल अशी जराही कल्पना नसते. त्याचवेळी एक बिबट्या हरणांच्या कळपावर हल्ला करतो. बिबट्याच्या हल्ल्याने हरिण घाबरतात आणि पळू लागतात. याच धावपळीत एक हरिण नदीच्या पाण्यात शिरतं.
पाण्यात गेल्यानंतर बिबट्या शिकार करू शकणार नाही, असं हरणाला वाटतं. परंतु बिबट्या पाण्यात उडी मारुन हरणाला पकडतो. त्याची मान पकडून त्याला नदीच्या बाहेर काढतो. बिबट्या हळू-हळू हरणाला खेचत एका झाडाजवळ आणतो.
त्याचवेळी बिबट्याला एक तरस दिसतो. तरस बिबट्याला हल्ला करण्याच्या दृष्टीने उडी घेतो, परंतु आपला जीव वाचवण्यासाठी बिबट्या हरणाला सोडून तेथून पळ काढतो. हा संपूर्ण प्रकार कॅमेरात कैद झाला असून व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral videos