नवी दिल्ली 15 मे : कधी-कधी असे काही किस्से घडतात की ते आठवल्यावर आपण एकटं असलो तरीही हसत बसतो. विशेषतः शाळा-कॉलेजच्या दिवसांतील किस्से नेहमी चेहऱ्यावर हास्य आणतात. आजकाल असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल (Funny Video Viral on Social Media) होत आहे, जो पाहून तुम्हाला खूप हसू येईल. हा व्हिडिओ एखाद्या हॉस्टेलमधील असल्याचं जाणवतं. यात गॅलरीत एका खोलीसमोर अनेक मुलं जमलेली दिसतात. गॅलरीच्या दोन्ही बाजूला अनेक रूम दिसत आहेत. या तरुणांसोबत याठिकाणी एक पोलीसही दिसतो. यासोबतच एक-दोन कर्मचारीही तिथे उभे असल्याचं दिसून येतं.
भीषण अपघातात गाडीचा अक्षऱशः चक्काचूर झाला; मात्र चालकाला खरचटलंही नाही, थक्क करणारा VIDEO
हे सर्व लोक या बंद रूमच्या समोर उभा आहे आणि दरवाजा खोलण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र दरवाजा आतून बंद आहे. यानंतर एक मुलगा पोलिसाला हातोडा आणून देतो. पोलीस हा हातोडा घेऊन दरवाडाच्या वरच्या बाजूला जोरजोरात मारतो, यामुळे आतली कडी तुटते. यानंतर रूमच्या आतील दृश्य पाहून सगळेच थक्क होतात. आतमधील तरुण अगदी आरामात झोपलेला दिसतो. एक मित्र त्याला झोपेतून उठवतो. यानंतर रूममध्ये इतकी गर्दी पाहून तोदेखील शॉक होतो.
View this post on Instagram
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की त्या मुलाचे एक्सप्रेशन पाहण्यासारखे आहेत. झोपेतच तो विचारतो, "काय झालं...?" त्याचे मित्रही त्याला विचारतात, "व्हाट हॅपन्ड टू यू?" ते त्याला सांगतात की बराच वेळ झाला रूम उघडण्याचा प्रयत्न करत आहे, आम्ही तुला किमान 20 वेळा कॉल केला आहे. त्या मुलाची परिस्थिती पाहून सर्व मुलं हसतात. मात्र, काही वेळाने त्याला संपूर्ण प्रकार समजतो.
दरवाजा आतून बंद होता आणि इकडे त्याचे मित्र दार ठोठावून थकले होते. त्यांनी रूममध्ये असणाऱ्या मुलाला अनेकवेळा फोनही केला होता. पण तो ना फोनला उत्तर देत होता ना दार उघडत होता. त्यानंतर मित्रांनी पोलिसांना बोलावलं. या व्हिडिओतील पोलीस कर्मचाऱ्याची परिस्थितीही पाहण्यासारखी आहे. मात्र, हा व्हिडिओ खूपच मजेशीर असून त्यावर अनेक लाईक्स आणि फनी कमेंट्स येत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Funny video, Sleep