व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की ट्रकसोबतच्या धडकेनंतर व्हॅनचा समोरचा भाग पूर्णपणे उद्धवस्त झाला आहे. हे पाहून वाटेल की आतील चालक या अपघातात नक्कीच बचावला नसेल. कारण व्हॅनच्या पुढील भागातील गाडीचं छत आणि बाजूचा पूर्ण भाग चक्काचूर झाल्याचं दिसतं. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे इतक्या भीषण अपघातानंतरही चालकाला काहीही झालं नाही आणि तो अगदी आरामात आपल्या सीटवर बसून होता. या भीषण अपघातात त्याला साधं खरचटलंही नाही. Video: लग्नात वधूनं दिला धक्का, पण पाण्यात पडणारा नवरदेवही काही कमी करामती नव्हता हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओला नेटकऱ्यांची चांगलीच पसंती मिळत आहे. व्हॅनच्या ड्रायव्हरसाठी नेटकरी या व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंटही करत आहेत. अनेकांनी कमेंट करत म्हटलं की हा व्यक्ती मृत्यूच्या तोंडातून बाहेर आला आहे. तर अनेकजण त्याचं नशीब चांगलं असल्याचं म्हणत आहेत. एका यूजरने मजेशीर कमेंट करत लिहिलं 'यमराज सुट्टीवर होते'View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.