नवी दिल्ली 14 मे : अपघात आणि बचावाचे व्हिडिओ सोशल मीडियावर सतत समोर येत असतात. अनेकवेळा लोक आपला जीव पणाला लावून इतरांचा जीव वाचवताना दिसतात. असे व्हिडिओ सोशल मीडियावर युजर्सची मनं जिंकताना दिसतात आणि सगळ्यांच्या पसंतीसही पडतात. नुकताच कझाकिस्तानमधून असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हिच्याही पसंतीस उतरल्याचं दिसत आहे.
कपडे काढून वॉटरफॉलखाली झोपला, अचानक कोसळला साप आणि...; अंगावर काटा आणणारा VIDEO
सोशल मीडियावर गुड न्यूज करस्पाँडंटने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये दिसणारी घटना कझाकिस्तानची आहे. जिथे टॉवर ब्लॉकच्या खिडकीतून एक लहान मुलगी बाहेर लटकत असल्याचं दिसलं. हे पाहून तिला वाचवण्यासाठी एक व्यक्ती आपला जीव धोक्यात घालून इमारतीवर चढला (Man Saves Child After Climbing 8 Floors of a Tower).
(Kazakhstan): Sabit Shontakbaev was walking with a friend yesterday when he saw a dangling toddler holding on for her life from a window on the 8th floor of a building. Immediately Sabit rushed into the building & ran up, getting access to the apt. below.pic.twitter.com/klmjWgFIXc
— GoodNewsCorrespondent (@GoodNewsCorres1) May 12, 2022
व्हायरल क्लिपमध्ये हा व्यक्ती एका तीन वर्षांच्या मुलीला वाचवण्यासाठी जवळपास 80 फूट उंचावर चढताना दिसत आहे. या व्यक्तीचं नाव सबित शोंटकाबाओ असं सांगितलं जात आहे. तसंच व्हिडिओ शेअर करत गुड न्यूज करस्पाँडंटने कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'सबित शोंटकाबाओ काल एका मित्रासोबत जात होता, तेव्हा त्याला एका इमारतीच्या 8व्या मजल्यावर खिडकीतून एक लहान मुल बाहेर लटकत असल्याचं दिसलं. याा मुलीला वाचवण्यासाठी सबित बिल्डिंगमध्ये गेला आणि अपार्टमेंटमध्ये जात तिला वाचवलं
वॉटरपार्कमध्ये भयंकर अपघात, स्लाईड तुटल्याने अनेक जण जखमी; VIDEO व्हायरल
सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे आणि सर्वांचं मन जिंकत आहे. बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मानेही या व्यक्तीचा व्हिडिओ इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत याला 'हिरो' असं कॅप्शन दिलं होतं. बातमी देईपर्यंत ट्विटरवर हा व्हिडिओ 15 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. प्रत्येकजण चिमुकलीला वाचवणाऱ्या या रिअल हिरोचं कौतुक करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.