• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • VIDEO: डिलिव्हरी बॉयला रस्त्यातच झाली अटक; पोलीस अधिकाऱ्यानं महिलेच्या घरी पोहोचवली ऑर्डर

VIDEO: डिलिव्हरी बॉयला रस्त्यातच झाली अटक; पोलीस अधिकाऱ्यानं महिलेच्या घरी पोहोचवली ऑर्डर

एका महिलेनं ऑनलाईन जेवण ऑर्डर केलं होतं. काही वेळानं महिलेनं दरवाजा उघडून पाहिला तर एक पोलीस गाडीवर तिची ऑर्डर घेऊन तिच्या घरी पोहोचला (Police Officer Delivered Food to Customer After Arresting Delivery Boy) होता

 • Share this:
  नवी दिल्ली 12 जुलै: एका पोलीस अधिकाऱ्याचा मोठेपण सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे. या घटनेत एका महिलेनं ऑनलाईन जेवण ऑर्डर केलं होतं. काही वेळानं महिलेनं दरवाजा उघडून पाहिला तर एक पोलीस गाडीवर तिची ऑर्डर घेऊन तिच्या घरी पोहोचला (Police Officer Delivered Food to Customer After Arresting Delivery Boy) होता. ही घटना अमेरिकेच्या (America) जोंसबोरो पोलीस ठाण्याच्या (Police Station) हद्दीतील आहे. पोलिसांनी या घटनेचा व्हिडिओ आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन (Social Media Account) पोस्ट केला आहे. पाय घसरून पडल्यानं गर्भवतीनं गमावलं बाळ; मिळाली 9 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा यामध्ये पाहायला मिळतं, की डिलिव्हरी बॉयला रस्त्याच अटक झाल्यानंतर कशा पद्धतीनं एका पोलिसानं महिलेची ऑर्डर तिच्यापर्यंत पोहोचवली. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेनं एका रेस्टॉरंटमधून ऑनलाईन जेवण ऑर्डर केलं होतं. डिलिव्हरी बॉय तिची ऑर्डर घेऊन येत असतानाच वाहतूक पोलिसांनी त्याला कोणत्या तरी कारणामुळे अटक केली. या डिलिव्हरी बॉयनं पोलिसांना आपण कोणत्या कामासाठी जात होतो हे सांगितलं. VIDEO: नवरी-नवरदेव जोमात अन् वऱ्हाडी कोमात; मंडपातच नवविवाहित कपलचा रोमँटिक मूड पोलिसांनी असा निर्णय घेतला की या महिलेनं ऑर्डर केलेलं जेवण तिच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. यानंतर पोलीस अधिकारी टायलर विलियम्सनं डिलिव्हरी बॉयकडून या महिलेचा पत्ता घेतला आणि ते थेट महिलेच्या घरी पोहोचले. यानंतर पोलीस अधिकाऱ्यानं महिलेच्या घराचा दरवाजा वाजवला. सुरुवातीला पोलीस दारात पाहून ही महिला घाबरली. मात्र, अधिकाऱ्यानं तिला सर्व प्रकार सांगत डिलिव्हरी बॉयला अटक केल्याची माहिती दिली. याच कारणामुळे आपण जेवण पोहोचण्यासाठी आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. या घटनेचा व्हिडिओदेखील व्हायरल झाला आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published: