Home /News /viral /

नवरी-नवरदेव जोमात अन् वऱ्हाडी कोमात; मंडपातच नवविवाहित कपलचा रोमँटिक मूड, पाहा VIDEO

नवरी-नवरदेव जोमात अन् वऱ्हाडी कोमात; मंडपातच नवविवाहित कपलचा रोमँटिक मूड, पाहा VIDEO

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये दिसतं, की लग्नात जेवणाच्या वेळी नवरदेव अत्यंत रोमँटिक मूडमध्ये (Romantic Video of Bride and Groom) आहे.

  नवी दिल्ली 12 जुलै : लग्नात (Marriage) सर्वांचंच लक्ष नवरदेव अन् नवरीबाईकडे (Bride and Groom) असतं. नवरी आणि नवरीदेव काय करत आहेत किंवा बोलत आहेत याकडे सर्वांचे कान आणि डोळे असतात. सोशल मीडियावर लग्नातील अनेक असे व्हिडिओ व्हायरल (Wedding Video Viral) होतात जे पाहून नेटकरीही हैराण होतात. असाच एका लग्नातील नवरदेव आणि नवरीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. VIDEO: लस घेणाऱ्या महिलेची झाली भयंकर अवस्था; दृश्य पाहून तुम्हालाही फुटेल घाम सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये दिसतं, की लग्नात जेवणाच्या वेळी नवरदेव अत्यंत रोमँटिक मूडमध्ये (Romantic Video of Bride and Groom) आहे. तो प्रेमानं नवरीला गुलाबजाम खाऊ घालत आहे. नवरीबाई अगदी छोटासा घास घेते आणि नंतर हाच गुलाबजाम नवरदेवाला खाऊ घालते. नवरीचं हे कृत्य पाहून नवरदेव लाजतो आणि कॅमेऱ्यासमोरच हसू लागतो.
  VIDEO: तरुणीनं एक्स बॉयफ्रेंडसाठी ऑर्डर केल्या सणसणीत चापटी, पाहा पुढे काय झालं नवरदेव अन् नवरीचा हा मजेशीर आणि रोमँटिक व्हिडिओ पाहून तुमच्याही चेहऱ्यावर नक्कीच हसू आलं असेल. हा व्हिडिओ निधी नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. आतापर्यंत 60 हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. सोबतच अनेकांनी यावर कमेंटही केल्या आहेत. अनेकांचं असं म्हणणं आहे, की या नवरीपेक्षाही नवरदेवच अधिक क्यूट आहे. नवरदेवाच्या लाजण्यावर आणि हावभावावर लोक भरपूर प्रतिक्रिया देत आहेत.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Bridegroom, Romantic day, Wedding video

  पुढील बातम्या