जाहिरात
मराठी बातम्या / Viral / स्तन नाही तरीही आपल्या पिल्लांना दूध पाजतं कबुतर, कसं? जाणून वाटेल आश्चर्य

स्तन नाही तरीही आपल्या पिल्लांना दूध पाजतं कबुतर, कसं? जाणून वाटेल आश्चर्य

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

कबुतराला देखील स्तन नाही, पण असं असलं तरी देखील कबुतर आपल्या पिल्लांना दुध पाजतो.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 20 जून : आपल्या आजूबाजूला काही अशा गोष्टी घडत असतात. ज्याबद्दल आपल्याला सगळचं माहिती नसतं. तुम्ही शाळेत हे शिकलाच असाल की सगळे पक्षी किंवा प्राणी हे सस्तन नसतात. त्यामुळे ते आपल्याला बाळाला दुध पाजू शकत नाही. अशा पक्षांमध्ये कबुतराचा देखील समावेश आहे. कबुतर सत्तन नाही. परंतू असं असलं तरी देखील तो आपल्या पिल्लांना दूध पाजू शकतो. आता सस्तन म्हणजे काय? तर ज्याला स्तन नाही तो सस्तन प्राणी नाही. कबुतराला देखील स्तन नाही, पण असं असलं तरी देखील कबुतर आपल्या पिल्लांना दुध पाजतो. त्याचं मूल अंड्यातून बाहेर आल्यानंतर पहिले तीन दिवस ते आपल्या बाळाला दूध पाजते. आता तुम्हाला असा प्रश्न नक्कीच पडला असेल की हे कसं शक्य आहे? खरं तर, मादी आणि नर दोन्ही कबूतरांच्या घशात अन्न साठवण थैली असते, ज्याला पीक म्हणतात, ज्यामधून दुधासारखा पांढरा द्रव बाहेर पडतो. मुलाच्या जन्मानंतर पहिले 28 दिवस कबूतर त्यांच्या चोचीने मुलांना तो पांढरा द्रव खायला घालतात. कितीही थंड ठिकाणी ठेवलं तरी वाईन का गोठत नाही? यामागचं सत्य तुम्हाला माहित असायलाच हवं कबुतरच काय तर हे पेंग्विनच्या बाबतीतही आहे. पेंग्वीन हा सस्तन प्राणी नाही तरी देखील तो आपल्या पिल्लांना दूध पाजतो. पेंग्विनमध्ये तर नर पेंग्विन आपल्या पिल्लांना दूध पाजतात. नर हे त्यांच्या अंड्याची काळजी घेतात, म्हणूनच नर पेंग्विन त्यांच्या तोंडातील पिकात फॅटी द्रव तयार करतात. जेव्हा मादा पेंग्विन अन्नाच्या शोधात बाहेर पडते, तेव्हा नर पेंग्विन हे द्रव नव्याने जन्मलेल्या मुलांना खाऊ घालतात. या यादीत लांब पायांचा पक्षी फ्लेमिंगो देखील आहे, पीक दूध नर आणि मादी दोन्ही पक्ष्यांमध्ये तयार केले जाते. ते आपल्या चोचीच्या साहाय्याने मुलांना देतात. विशेष म्हणजे फ्लेमिंगोचे पीक दूध लाल रंगाचे असते, कारण या पक्ष्याचा रंग लाल असतो. भारतातील 5 सर्वात धोकादायक साप, विषाच्या एका थेंबाने होऊ शकतो मृत्यू ओशन बिटल किंवा पॅसिफिक बीटल झुरळाच्या अळ्या मादी झुरळाच्या आत वाढतात, दरम्यान, अळ्या जे द्रव वापरतात त्याला वैज्ञानिक रित्या दूध म्हणतात, वैज्ञानिकांच्या मते पृथ्वीवर यापेक्षा जास्त कॅलरी असलेले दुसरे दूध नाही. रंगीबेरंगी डिस्कस मासेही आपल्या मुलांना खायला घालण्यासाठी दूध बनवतात. नर आणि मादी दोघेही त्यांच्या त्वचेपासून दुधासारखे स्लाईम तयार करतात. जन्मानंतर तीन आठवडे मुलांना हे स्लाईम दिला जातो. पांढऱ्या शार्कच्या शरीरातही दूध तयार होते, खरं तर ग्रेट व्हाईट शार्कची मुले त्याच्या गर्भाशयात विकसित होतात, परंतु नाळ नसल्यामुळे पोषण त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. म्हणूनच ग्रेट व्हाईट शार्कचे गर्भाशय स्वतःच दुधासारखे द्रव सोडते, ज्यामुळे वाढत्या गर्भाला आवश्यक पोषण मिळते आणि त्यांचा विकास होतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात